Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
संक्रातीला प्रातःकालीन स्वरोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

निसर्गसंपन्न कांदाटी खोरे येथे नौका पर्यटन आणि जंगलस्टेसह ट्रेकिंगची सोय उपलब्ध होणार

‘जी-२०’राष्ट्रांच्या अतिथी प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण

संक्रातीला प्रातःकालीन स्वरोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 15, 2023
404 4
0
561
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची प्रातःकालीन सभा संपन्न

जळगाव l दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर (सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार) व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची प्रातःकालीन सभा गुलाबी थंडीच्या पार्श्वभूमीवर व मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाली. ऐन गुलाबी थंडीत हा स्वरवर्षाव तमाम जळगावकर रसिकांना सुखावून गेला.

प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार सुरुवातीला गुरुवंदना मयूर पाटील यांनी सादर केली. दीपप्रज्वलन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. अमन मित्तल यांच्यासह कलावंत ओंकार प्रभू घाटे व संपदा माने यांच्याहस्ते झाले. या संगीत सभेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे स्वागत प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. कलावंत ओमकार प्रभू घाटे यांचा सत्कार जिल्हाधिक्कारी अमन मित्तल यांनी केला. तर संपदा माने यांचा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, रामकृष्ण करंबेळकर यांचा दीपक चांदोरकर, वरद सोहनी यांचा प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे, गणेश मेस्त्री यांचा मेजर नानासाहेब वाणी तर सुसंवादिनी अनुश्री फडणीस-देशपांडे चे स्वागत दीपिका चांदोरकर यांनी केले.

खानदेशच्या सांस्कृतिक मानदंडाचा स्वराभिषेक अर्थात एकविसावं आवर्तन स्वराभिषेकाचं.. या कार्यक्रमात ओंकार आणि संपदा यांनी अनेक गाजलेली नाट्यगीत व अभंग सादर केलेत. यामध्ये प्रामुख्याने ‘ब्रह्ममूर्ती मंत्र’, ‘श्रीरंगा कमला कांता’, ‘निराकार ओंकार’, ‘सोहम हर डमरू बाजे’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘निर्गुणाचा संग’, ‘जोहार मायबाप जोहार’ ही नाट्यपदं ओमकार व संपदा यांनी दमदारपणे सादर करून रसिकांना या गुलाबी थंडीत आसनांवर खेळवून ठेवलं. त्याचबरोबर ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘पांडुरंगी नामी’, या अभंगांनी मैफिल भक्तीरसात चिंब भिजू लागली. ओंकार ने ‘ध्यान लागले रामाचे’, ‘संत भार पंढरीत’, ‘अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर’, ‘इंद्रायणी काठी देहाची आळंदी’ हे अभंग सादर करून रसिकांना वाहवा मिळवून त्यांना भक्ती रसाच्या स्वरवर्षावात तृप्त केले.

त्याला उपज अंगाने तितकीच दमदार साथ संगत रामकृष्ण करंबेळकर (तबला) गणेश मेस्त्री (पखावज) यांनी केली संवादिनीवर वरद सोहनी यांची बोटे लिळ्या फिरत होती. वरद ने संगत केली. तालवाद्यावर धनंजय कंधारकर यांनी आपलं महत्त्व अधोरेखित केलं. या संपूर्ण कार्यक्रमाला एका सूत्रात गुंफण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सुसंवादीनी अनुश्री फडणीस-देशपांडे यांनी उत्तमरित्या केलं ‘अग वैकुंठीचे राया’ या भैरवीने २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या स्वरोत्सवाची प्रातःकालीन संगीत मैफल झाली. आभार दीपक चांदोरकर यांनी मानले. या प्रातःकालीन सभेच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त वरुण देशपांडे, मयूर पाटील, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर, जुईली कलभंडे, आशिष मांडे, अनघा गोडबोले, शोभा निळे यांनी परिश्रम घेतले.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismGandhi teerthIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In