Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सप्तश्रृंगी गडाचा विकास आराखडा सादर करावा

वनविभागाने जिल्ह्यात इको टुरीझमस्थळे विकसित करण्यासाठी लवकरच आराखडा तयार करावा

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वंकष आणि परिपूर्ण असावा

सप्तश्रृंगी गडाचा विकास आराखडा सादर करावा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 3, 2022
402 5
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गर्दी लक्षात घेता संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने समांतर पर्यायी व्यवस्था तयार करावी…

श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवी गड ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र आराखडा बैठकीत मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

नाशिक l श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानावार आधारित विकास आराखडा सादर करावा, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित यंत्रणा अधिकाऱ्यांना दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवी गड ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र आराखडा, भाविकांची सुविधा याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शहाजी उमाप, निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उप वनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, कळवण तहसिलदार बंडू कापसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, नियोजन अधिकारी शशांक काळे, सप्तश्रृंगी निवासीनी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, उपव्यवस्थापक भगवान नेरकर, सप्तश्रृंगी गड सरपंच रमेश पवार, नांदुरीचे सरपंच सुभाष राऊत, वणी ग्रामपालिका सदस्य संदीप बेणके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, श्री सप्तश्रृंगी तिर्थक्षेत्रास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असल्याने याठिकाणी यात्रेकरिता 20 ते 30 लाख भाविक येत असतात. भाविक व पर्यटक यांना अत्याधुनिक प्रकारच्या मुलभूत व पायाभूत सेवा सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वायातून नियोजनबद्ध आराखडा तयार करावा. रस्त्यांचेक्राँक्रीटीकरण करतांना भविष्यात ड्रेनेजलाईनची तोडफोड होणार नाही यादृष्टीने आताच तशी तरतूद करण्यात यावी. गडाच्या ठिकाणी डोम बांधतांना सर्व स्थानिकांची दुकाने एका रांगेत राहातील व हवा खेळती राहील वपावसाच्या दिवसांत पाण्यापासून संरक्षण होईल अशी रचना करण्यात यावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री.भुसे यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी पाण्याचे पर्यायी स्त्रोत, साठवण तलाव निर्मितीची स्थळे यासाठी स्थानिक लोकांना भेटून चर्चेद्वारे ती स्थळे निश्चित करण्यात यावीत. जलजीवन मिशन योजनेतून नांदूरी येथील स्थानिक तलावाची साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने दुरूस्तीची कामे करण्यात यावीत. नुकत्याच झालेल्या नवरात्र महोत्सवात गडावर दर्शनासाठी जास्त प्रमाणात झालेली गर्दी लक्षात घेता संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने समांतर पर्यायी व्यवस्था तयार करावी. यासाठी पुर्वीचा नांदूर ते गडापर्यंतच्या 5 कि.मी चा रस्ता, गणपती मंदीर ते वणीगड रस्ता त्याचप्रमाणे प्रदक्षिणा मार्ग हे योग्य त्या दुरूस्तीसह कार्यान्वीत करण्याचे नियोजन करावे. भाविक मार्गांवर व गडावर दरड कोसळून अपघात टाळण्याच्या दृष्टीने उपययोजना करावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमरे बसविण्यात येवून गडावरील 2 एकर जागेत स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापनेचा प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात यावा, असेही निर्देश पालकमंत्री श्री.भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

Agastya Sea View Apartments, Dapoli

गडाच्या पायथ्याशी मोकळ्या जागेत भाविक व पर्यटकांसाठी उद्याने तयार करण्यात यावी. त्याचप्रमाणे उपहारगृह, चहापान व्यवस्था, खाणावळ या ठिकाणी उभारण्यासाठी स्थानिकांना रोजगार मिळेल उदरनिर्वाहाच्या यादृष्टीने त्यांना प्रोहत्सान देण्यात यावे. पर्यटकांसाठी मार्ग दिशादर्शक फलक उभारावेत. सर्व नियोजित कामांचे प्रस्ताव स्थळभेटी व स्थानिक रहिवाशी यांच्या सोयी सुविधा लक्षात घेवून प्रस्तावित करण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक लोकसहभागातून विकासाच्या उपाययोजना कराव्यात – विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे – सप्तश्रृंगी गड तिर्थक्षेत्र विकासासाठी संबंधित यंत्रणांनी स्थानिक पातळीवर सर्वेक्षणातून व लोकसहभागातून विकासाची स्थळे निश्चित करावीत व त्यादृष्टीने उपयायोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले महाराष्ट्रातील इतर विकसित तिर्थस्थळांच्या धर्तीवर सप्तश्रृंगी गड तिर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे. या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. सप्तश्रृंगी गड यथे सांडपाणी प्रकल्प तयार करतांना सांडपाणी मोकळे न सोडता प्रक त्याचा ग्रामपंचायतीला पुनर्वापर करता येईल अशी व्यवस्था करावी.

निश्चित केलेल्या स्थळांवर 10-10 चे युनिट तयार करून ई-टॉयलेट, बायो-टॉयलेटनिर्मिती व त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा निश्चित करण्यात यावी. मोकळ्या जागेत करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणांतून वृक्षांचे संवर्धन करण्यात यावे. वीज व्यवस्था, पाणीपुरवठा, तिर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे श्री. गमे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महिनाभरात नियोजनबद्ध व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.

Ambiance Cottege, Diveagar (Video)
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाईJuly 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधीJuly 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानाJuly 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवातJuly 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourismNashik tourismSaptshrungi Devi
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In