Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
चंद्रपूर व्याघ्र सफारी व वन्यजीव बचाव केंद्राच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण

कॉफीटेबल बुक ‘समग्र रायगड’

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क संस्थेस अनुदान स्वरुपात निधी

चंद्रपूर व्याघ्र सफारी व वन्यजीव बचाव केंद्राच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 22, 2022
411 4
0
570
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्गालगत नवीन व्याघ्र सफारी निर्माण करण्याच्या दृष्टीने जागेची निवड

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

पर्यटन वाहनांच्या सनियंत्रणाकरीता बघीरा संगणकीय प्रणाली कार्यान्वित

पालकमंत्र्यांकडून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित कामांचा व पर्यटन क्षेत्राचा आढावा

चंद्रपूर l मोहर्ली येथील ताडोबा पर्यटन प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण तसेच चंद्रपूर व्याघ्र सफारी व वन्यजीव बचाव केंद्राच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत वनअकादमी येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित कामांचा व पर्यटन क्षेत्राचा आढावा घेतला.

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुड्डा, वन अकादमी (चंद्रमा)चे संचालक श्रीनिवास रेड्डी, अपर संचालक प्रशांत खाडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगांवकर, उपसंचालक नंदकिशोर काळे तसेच विविध वनविभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वनविभागातील विकासकामे करतांना अतिशय उत्तम व वैशिष्ट्यपूर्ण अशी करावीत. प्रवेशद्वाराचे काम सुसज्ज व नाविन्यपूर्ण कसे करता येईल ते बघावे. चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्गालागत वन्यजीव बचाव केंद्र (रेस्क्यू सेंटर) प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील नवे तर देशातील चांगले रेस्क्यू सेंटर या ठिकाणी तयार करावे. जगातील चांगले बर्डपार्क भारतात निर्माण करता यावे, यासाठी दुबई, सिंगापूर व जामनगर येथील बर्डपार्कला वनाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी.

शक्ती आणि सौंदर्य यांचे प्रतीक असलेला वाघ या विलक्षण प्राण्याचा संचार ताडोबात असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पास राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांचा ओघ ताडोबाकडे वाढत असून व्याघ्र दर्शनासाठी एक हमखास प्रकल्प म्हणून ताडोबाची ओळख निर्माण झाली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांकरीता उत्तम दर्जाची सुविधा निर्माण करणे, पर्यटनाचा दर्जा उंचावून त्यास आंतरराष्ट्रीय पातळीचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे याकरीता विविध विकासाची कामे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रातील मोहर्ली, पांगडी व कोलारा या प्रवेशद्वारांचे सुशोभीकरणाचे काम तसेच चंद्रपूर व्याघ्र सफारी व वन्यजीव बचाव निर्मिती करण्यात येत आहे. सदर कामे ही प्रस्तावित असून पूर्णत्वास येणार आहेत.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर येथे चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्गालगत वन प्रबोधिनीच्या बाजूला व्याघ्र सफारी निर्माण करण्याच्या दृष्टीने जागेची निवड करण्यात आली आहे. याच परिसरात वन्यजीव बचाव केंद्र प्रस्तावित असल्याने दोन्ही प्रकल्पाला एकमेकांना पूरक अशी व्यवस्था निर्माण होईल. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा ताण कमी होऊन स्थानिकांना रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे.  त्यासोबतच वनपरिक्षेत्र चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील मामला प्रवेशद्वारालगत निसर्ग शिक्षण संकुल तयार करणे प्रस्तावित आहे. मदनापुर येथे निसर्ग शिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे विविध प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. पांगडी येथे उपजीविका केंद्राची  सुरुवात करून एकूण 210 युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

पर्यटन वाहनांच्या सनियंत्रणाकरीता बघीरा संगणकीय प्रणाली माहे-नोव्हेंबर 2020 मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पर्यटन जिप्सी वाहनाच्या वेगावर नियंत्रण, नमूद पर्यटन रस्त्यावर फिरण्याकरिता नियंत्रण ठेवणे आदी कार्य सोपे झाले आहे. पर्यटन सुविधांकरीता स्वतंत्र अशी वेबसाईट ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू करण्यात आली. पर्यटकांना विश्रांतीकरीता निवारा, फायर व्यवस्थापन, वणवणवा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. आदीं विषयांची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांना दिली.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाईJuly 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधीJuly 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानाJuly 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवातJuly 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourismTadoba AndhariTadoba Tigerचंद्रपूर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In