Monday, November 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यटन नवा विचार, नवी दिशा अंतर्गत पर्यटन परिषद संपन्न…

चला जाणूया नदीला

जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाला भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक मानांकन

पर्यटन नवा विचार, नवी दिशा अंतर्गत पर्यटन परिषद संपन्न…

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 14, 2022
427 4
0
593
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर (दिनदर्शिका)

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही रायगड किल्ला येथे महोत्सवाचे नियोजन…. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई l राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार असून ते राबविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध संस्था व शासनाच्या समन्वयाने राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालय ‘पर्यटन नवा विचार, नवी दिशा’ अंतर्गत आणि दै. मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते.

यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन.पाटील, सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर, तरुण भारतचे संपादक किरण शेलार यासह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन उपक्रम राबवण्यासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांची एक समिती नेमण्यात येईल. या समितीमार्फत राज्यभरात पर्यटन विषयक उपक्रम राबवण्यात येतील. महिलांना पर्यटन उद्योग क्षेत्रामध्ये संधी मिळावी यासाठी पर्यटन गाईड किंवा यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवावेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातूनही पर्यटन विषयक कौशल्य वृद्धीसाठी आपल्या सर्वांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून विविध पर्यटन विषयक उपक्रम राबवून रोजगार निर्माण करण्याचे नियोजन करता येईल. पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी देखील आपल्या सूचना मांडाव्यात. शासन व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. या संवादातून महाराष्ट्र पर्यटन क्षेत्र देशातच नव्हे तर राज्यातही आपले स्थान निर्माण करेल. छत्रपती शिवरायांची पावन भूमी असलेले महाराष्ट्राची माहिती पर्यटकांना होण्यासाठी विविध उपक्रम राबवता येतील. कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही रायगड किल्ला येथे महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे यासाठी सूचना कराव्यात. राज्यातील १५ महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शौचालय तसेच मुलभूत सोयी देखील करण्यात येतील, असे मंत्री श्री. लोढा म्हणाले.

या कार्यक्रमात शिल्पा बोरकर यांनी पर्यटन विषयक शैक्षणिक संस्था, ओंकार ओक याने साहसी पर्यटन, मिलिंद चाळके यांनी कृषी पर्यटन, कॅरॅव्हन पर्यटन सचिन पांचाळ, ऐतिहासिक पर्यटन अस्लम सय्यद, शाश्वत पर्यटन महेश म्हणगोरे, ट्रेल संस्था रिद्धी जोशी, वेलनेस टुरिझम ऑपरेटर उमेश उणिकृष्णन, मेडिकल टूरिझम मिहीर व्होरा, वाईल्ड लाईफ टुरिझम लोकेश तारदलकर, टूरिझम असोसिएशन जय भाटिया, टुरिझम कन्सल्टंट मकरंद केसरकर, कंटेंट क्रिएटर अंकिता वालावलकर, अमोल जमदरे, गिआयटी टूर ऑपरेटर अमर महाजन यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रातील अडचणी, आव्हान आणि समस्या यावर सादरीकरण करून पर्यटन क्षेत्रात आवश्यक बदल याबाबत मते मांडली. राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात बाजी मारणाऱ्या महाराष्ट्रातील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दै.तरूण भारतचे संपादक श्री. शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.

या परिषदेत शैक्षणिक संस्था – विद्यापीठे आणि खाजगी महाविद्यालये, कारवान टूर ऑपरेटर, साहसी टूर ऑपरेटर, कृषी टूर ऑपरेटर, वन्यजीव टूर ऑपरेटर, शाश्वत टूर ऑपरेटर, हेरिटेज टूर ऑपरेटर, पर्यटन संघटना, ट्रॅव्हल स्टार्ट-अप, कंटेंट क्रिएटर्स, ट्रेल संयोजक (वारसा/वन्यजीव/पाकशास्त्र), सहायक सेवा प्रदाते, समूह समावेशी टूर ऑपरेटर यांनी सहभाग घेतला होता.

  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात अंदाजे तीन हजार… Read more: (no title)
  • गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    *.!**भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत प्रदर्शन**अशोक जैन, अनिल जैन यांच्या… Read more: गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
  • लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर… Read more: लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
  • छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेत दाखल मुंबई | महाराष्ट्र पर्यटन… Read more: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
  • सिद्धेश्वर मंदिर माचनूर
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    सोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले गेले, याचा उल्लेख सापडत नाही,… Read more: सिद्धेश्वर मंदिर माचनूर
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismForts of maharshtraIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourismmaharashtra tourism departmentRATNAGIRIratnagiri tourismTarun Bharatतरुण भारत
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In