
पर्यटन मित्र 2022 पुरस्काराचे वितरण

पर्यटन संचालनालय (DoT) कोकण विभाग नवी मुबई व पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून समर्थ कृषी पर्यटन केंद्र येथे पालघर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक यांच्या समवेत पर्यटन व्यवसायातील संधी व आव्हान चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालय कडे असलेल्या विविध पर्यटन योजनांची जसे कृषी पर्यटन धोरण सह सहाशे पर्यटन धोरण इत्यादी बाबत सविस्तर माहिती कोकण विभागाचे उपसंचालक मा. श्री हेडे साहेब यांनी दिली. कृषी पर्यटन योजनांची नोंदणी करण्याचे आव्हान त्यांनी केले.
पर्यटन संचालनाच्या कोकण विभागाने यावर्षी पर्यटन मित्र 2022 पुरस्कार श्री जयवंत चौधरी अध्यक्ष पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन तसेच श्री जगदीश ठाकूर संचालक विहंग विहार तथा उपाध्यक्ष पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि श्री अजय राऊत भास्कर वाडी कृषी पर्यटन केंद्र यांना पर्यटन मित्र 2022 पुरस्कार प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सदर प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.जयवंत चौधरी,उपाध्यक्ष श्री.प्रभाकर सावे व श्री. जगदीश ठाकुर, कार्यवाह श्री.अजय राऊत तसेच कार्यकारणी सदस्य श्री. विजय घरत, श्री. नितीन म्हात्रे तसेच केळवा पर्यटन संघाचे अध्यक्ष श्री. रोहित राऊत, जव्हार पर्यटन संघाचे श्री. पारस सहाने तसेच सर्व व्यावसायिक बांधव उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी शेतकरी बांधवांना कृषी पर्यटन केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त श्री. गणेश प्रधान यांनी केले. कार्यक्रमाला समर्थ कृपा कृषी पर्यटन केंद्र श्री. विजय माळी यांनी संपूर्ण सहकार्य केलं.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन
