Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
ग्रामविकासाला चालना देणाऱ्या गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनाचे उद्घाटन

पर्यटन व्यवसायिकांसमवेत व्यवसायातील संधी व आव्हान चर्चासत्र संपन्न

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव शासनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवणार

ग्रामविकासाला चालना देणाऱ्या गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनाचे उद्घाटन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 4, 2022
403 4
0
560
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाश्वत पर्यावरणासह ग्रामोद्योगाला चालना देणारे दिशादर्शक प्रदर्शन – डॉ. सुदर्शन आयंगार

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

जळगाव l ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी कौशल्याला मूल्य कमी असेल असे वाटत असताना, महात्मा गांधीजींनी शिकविलेल्या रचनात्मक कार्यामुळे तंत्रज्ञानाला जोडून श्रमाची अस्मिता जपली जाऊ शकते, यातून आर्थिक समानता आणि रोजगार निर्मितीतून अहिंसात्मक समाजनिर्मितीचे कार्य आजच्या काळात सुरू ठेवण्याला प्रेरणा मिळते. याचेच दर्शन शाश्वत पर्यावरणासह ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या या प्रदर्शनातून होत आहे.’ असे उद्गार गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार यांनी काढले.

दिल्ली येथील भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएसएसआर) आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आणि गांधी जयंती निमित्त ‘हाऊ गांधी कमस अलाईव्ह’ (How Gandhi comes alive) या महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. सुदर्शन आयंगार बोलत होते. गांधी तीर्थ येथे सकाळी ११.३० वाजेला हा उद्घाटन सोहळा पार पडला.

याप्रसंगी नागपूर येथील नागपूर येथील वंडरग्रास संस्थेचे संचालक वैभव काळे, पुणे येथील आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य आनंद उकिडवे, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डीन प्रो. गिता धरमपाल, सौ. अंबिका अथांग जैन, उदय महाजन, गिरीष कुलकर्णी, नितीन चोपडा, अनिल जोशी, डॉ. आश्विन झाला उपस्थित होते.

डॉ. सुदर्शन आयंगार यांनी चरखावर सुतकताई करून प्रदर्शनाचे उद्घान केले. प्रदर्शन 4 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत गांधी तीर्थ येथे पाहता येणार आहे. प्रदर्शनामध्ये महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यापैकी 18 बाबींवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. ग्रामीण भागात असलेल्या कौशल्याचा वैज्ञानिक कसोट्यांवर वस्तूनिष्ठपद्धतीने उद्योजकिय संस्कार देता येतो. यासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गांधीजींचे स्वदेशीचे विचारांचे प्रतिक प्रदर्शनात पाहता येते. या प्रदर्शनातील वैशिष्ट्य म्हणजे रेखाचित्रातून महात्मा गांधीजींची प्रतिमा साकारण्यात आली आहे. यातील एक रेषा ही सुताचा धागा असल्याचे प्रतिक मानले आहे. आणि हा धागा (रेषा) प्रदर्शनात अखंडपणे दाखविण्यात आली आहे. चरखाच्या सुताच्या धाग्यातून स्वराज्याची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

ग्रामोद्योग ही संकल्पना समोर ठेऊन गांधीजींचा हा सुताचा धागा पुढे जातो आणि स्थानिक कुशलता व ज्ञानव्यवस्थेवर आधारित वास्तुकला, विणकाम, भरतकाम, हस्तकला, वैदिक गणित पद्धती, संगीत, शिक्षण, आरोग्य, आदीसह ग्रामोद्योगामध्ये शाश्वत पर्यावरणासह विकासात्मक समाजव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणाऱ्या गांधी रिसर्च फाऊंडेशनसह अन्य सेवाभावी संस्थांची माहिती प्रदर्शनात देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील बाराबलुतेदारपद्धतीचा पुर्नविकासाचा संदेश हा धागा देतो. प्रदर्शनीच्या शेवटी याच धाग्याचे कापडात रूपांतर होऊन वर्तमानातील गांधीजींना अपेक्षित असलेली स्वराज्य ही संकल्पना समजविण्याचा प्रयत्न केला आहे.

हे प्रदर्शन गांधी तीर्थ अभ्यागतांना 16 ऑक्टोबर पर्यंत पाहता येईल. याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी डॉ. आश्विन झाला, डॉ. निर्मला झाला, योगेश संधानशिवे, आदिती त्रिवेदी, रिती शहा यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

‘महात्मा गांधीजींचे विचार आणि कल्पनांचा प्रचार व प्रसार ह्या प्रदर्शनातून होत आहे. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या प्रदर्शनाचा असून विविध कलाकौशल्यांसह ग्रामीण कलाकारांना व्यवसाभिमूख करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया सौ. अंबिका जैन यांनी दिली.’

गाव, खेड्यांमध्ये पारंपारिक कलाकौशल्य कलावंतांमध्ये असतात. त्यांच्याकडे पिढ्यान् पिढ्या हे कौशल्य संस्कारित होत असते मात्र उद्योजकीयदृष्टीने त्यांना व्यासपीठ मिळत नाही यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गांधीजींच्या रचनात्मक कार्यावर या प्रदर्शनात प्रकाश टाकण्यात आला आहे; कारण महात्मा गांधीजी हे स्वत: ग्रामीण भागातील जीवनशैली सुधारण्यासाठी कृतिशील प्रयत्न करित होते. त्यामुळेच त्यांनी खेडांकडे चला असा संदेश दिला. यामुळे हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया प्रो. गिता धरमपाल यांनी दिली.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In