Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
दिवेआगरचा सोन्याचा गणपती – VIDEO

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका

प्रसाद योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास

दिवेआगरचा सोन्याचा गणपती – VIDEO

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
510 5
0
708
SHARES
3.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोन्याचे बाप्पा प्रकट झाले आणि दिवेआगर हे गाव पर्यटनस्थळ म्हणून उजेडात आले.

दिवेआगर येथे आपण दोन तीन दिवस मुक्काम करून बघू शकू अशी अनेक मंदिरे, समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळे आहेत

सुवर्ण गणेशाचे प्राचीन मंदिर – रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव. विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ सुपारीच्या गर्दीत लपलेली कौलारू घरे असा निसर्गरम्य परिसर लाभलेले दिवेआगर गाव प्रसिद्धीस आले ते इथे सापडलेल्या श्री सुवर्ण गणेशाच्या प्रतिमेमुळे.

१७ नोव्हेंबर १९९७ साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे कलम लावत असताना तीस किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली होती. गावकऱ्यांच्या उपस्थितीत पेटी उघडली गेली त्यावेळी आतमध्ये एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा होती. त्या पेटीमध्ये एका छोट्या तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढविण्यासाठी २८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार होते. ही गणेश प्रतिमा म्हणजे भरीव मूर्ती नसून मुखवटा होता. ज्या मुर्तीवर हा मुखवटा चढवला जात असेल ती प्राचीन मूळ आणि भरीव मूर्ती मात्र मिळून आली नव्हती.

तांब्याची पेटी जमिनीखाली तीन फुटांवर सापडली असल्याने प्रचलित कायद्यानुसार सरकारदरबारी जमा करण्यात आली. मात्र भक्तांच्या आणि गावकऱ्यांच्या मागणीवरून ही सुवर्ण गणेश प्रतिमा आणि तांब्याची पेटी गावातीलच श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

सुवर्ण गणेश प्रतिमेवर मस्तक, कान, खांदे यावर चाफ्याची फुलं आणि पायरी आंबे असे आकार कोरलेले होते. यावरून ही मूर्ती प्राचीन असल्याची खात्री पटते.

दिवेआगर गाव पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिद्ध झाले – सुवर्ण गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले असेच म्हणावे लागेल. भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी गावात घरगुती निवासासाठी ‘होम-स्टे’ ही संकल्पना साकारली गेली. आलेल्या पाहुण्यांसाठी सर्व सोयींनी युक्त ‘सेल्फ कन्टेन्ड’ अशा खोल्या अस्तित्वात आल्या. समुद्र किनारी आणि गावात झालेल्या रिसॉर्ट्समुळे पर्यटकांची निवासाची चांगली सोय झाली. दिवेआगरचा शांत, सुरक्षित सागरकिनारा पर्यटकांना आवडू लागला.

सोन्याचा गणपती लुप्त झाला – श्री सिध्दीविनायक मंदिरावर सशस्त्र दरोडा पडून सुवर्ण गणेशाची प्राचीन प्रतिमा चोरीस गेली. 24 मार्च 2012 रोजी रात्री या मंदिरावर सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गणपती मंदिरात असलेली जवळपास दिड किलो वजनाची सोन्याची गणेश मुर्ती लुटून नेली होती. संपूर्ण कोकणाला आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत महादेव गोपाळ घडशी आणि अनंता बापू भगत या दोघा सुरक्षा रक्षकांचा लुटारूंनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. कालांतराने दरोडा टाकणारे सर्व आरोपी सापडले. त्यांच्याकडून वितळवलेले सोनेही मिळाले, पण सोन्याचा बाप्पा मात्र लुप्त झाला तो कायमचाच.

नवीन सोन्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना – मूर्ती चोरीला गेल्यानंतर 9 वर्षांनी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी मंदिरात नवीन सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दिवेआगर परिसरातील बघण्यासारखी धार्मिक स्थळे – दिवेआगर येथे आपण दोन तीन दिवस मुक्काम करून बघू शकू अशी अनेक मंदिरे आणि पर्यटन स्थळे आहेत. अगदी गावातच असलेले श्री उत्तरेश्वर महादेव, श्री रुप नारायण आणि सुंदर नारायण मंदिर, सोन्याच्या गणपतीचे प्रगटस्थान, दिव्याची वाडी (या ठिकाणी पुर्वी आपोआप दिवा लागत जात असे, यावरूनच बहुदा या गावाला दिवेआगर नावं पडल असावे) ही सगळी ठिकाणे एकादिवासात बघून होऊ शकतात. जवळच असलेला मुरुड जंजीरा किल्ला, श्रीवर्धन येथील पेशवे स्मारक, दक्षिण काशी म्हणुन प्रसिद्ध असलेले हरिहरेश्वर मंदिर आणि समुद्र किनारा हा देखील बघण्यासारखा आहे.

कुसुमेश्वर देवस्थान – दिवेआगर पासुन जवळच अंदाजे 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवखोल या गावाजवळ कुसुमेश्वर महादेवाचे प्रचिन मंदिर आहे. हे मंदिर एकांतात असल्याने येथे अतीशय शांतता असते. देवदर्शन घेतल्यावर अतिशय प्रसन्न वाटते. मंदिर परिसरात शेकडो प्राचीन मुर्ती रचून ठेवलेल्या दिसून येतात. लहान मोठया आकाराच्या आणि अप्रतिम नक्षीकाम असलेल्या या मुर्ती शेकडो वर्षांपासून येथे आहेत. मंदिरासमोर एका खोलीत भगवान विष्णू यांची अंदाजे पाच फुट उंचीची भग्नावस्थेतील मुर्ती आहे.

समुद्रकिनारा – दिवेआगरचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथला ५ कि. मी. लांबीचा स्वच्छ, केवड्याच्या बनाची किनार लाभलेला सुंदर समुद्र किनारा आणि मनमोहक वृक्षसंपदा यामुळे प्रथम येणारा पर्यटक दिवेआगरच्या प्रेमात पडत असल्याने तेथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. फेसाळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर आकाशात झेपावणारे पांढऱ्याशुभ्र `सीगल` पक्ष्यांचे थवे दिसतात. सूर्यास्ताचे विहंगम दृश्य बघण्यासारखे असते.

पर्यटकांना आकर्षित करणारे पूरक प्रकल्प – दिवेआगर समुद्र किनारी वेगवेगळ्या `वॉटर राईड्स` खूप रोमांचकारी असल्याने पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. वॉटर स्कूटर, जेट स्किइंग, सोफा राईड असे जलक्रीडा प्रकार अनुभवता येतील. यासह कांदळवन सफारी, कासव महोत्सव, सीशोअर वॉल्क, वॉटर स्पोर्ट्स, पक्षी निरीक्षण, बलून राईड, सी रॉक मारिन सफारी असे प्रकल्प दिवेआगर परिसरात सुरू झाले आहेत.

सी रॉक मरीन सफारी l खुल्या समुद्रात साहसी सफर l महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड द्वारा मान्यता प्राप्त l दिवेआगरपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले भरडखोल हे मच्छीमारांचे गाव पर्यटकांसाठी थोडे अपरिचितच. गावाजवळील शेखाडी येथे असलेल्या समुद्रात पाण्यातून वर आलेला एक दगडी स्तंभ सी रॉक म्हणून ओळखला जातो. पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी डेअरव्हेंचर सी रॉक मरीन सफारी येथे सुरू करण्यात आली आहे. पराग पिंपळे आणि ग्रुपने स्थानिकांच्या सहकार्य आणि सक्रिय सहभागाने ही फेरी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. भरडखोल समुद्र किनाऱ्यापासुन या सी रॉक पर्यंत खुल्या समुद्रात हि साहसी सफर घडवली जाते. सी रॉकला वळसा घालुन ही नाव परत येते. रोमांच, उत्कंठा, साहस आणि थराराने परीपूर्ण सी रॉक मरीन सफारी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

बर्ड वॉच आणि कांदळवन सफारी – दुर्मिळ प्रजातींचे पक्षी, तसेच स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी असे मिळून दिवेआगर आणि परिसरात तब्बल १३० प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद केली गेली आहेत. जंगलात जाऊन बर्ड वॉचींग करण्याची संधी पक्षी प्रेमींना येथे मिळू शकते.

कोकण उत्पादनासाठी प्रसिद्ध दिवेआगर गाव दिवेआगर येथील मोदक खूप प्रसिद्ध आहेत. इथे येणारे पर्यटकांनी उकडीच्या मोदकासह साजूक तुपाचा आस्वाद जरूर घ्यावा. उच्च प्रतीचे काजू, मसाले, पोह्याचे/तांदुळाचे पापड, मिरगुंड, कडवे वाल, कोकम/आवळा सरबत असे अस्सल कोकणी प्रोडक्ट्स येथे उपलब्ध असतात. दिवेआगरची सुपारी देखील प्रसिद्ध आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,600)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही,… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
Tags: agro tourismDiveagarIndia Tourismkokankokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourismSuvarna Ganesh DiveagarSuvarna ganesh mandir DiveagarSuvarnaganesh Diveagarसुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In