Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
प्रसाद योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास

दिवेआगरचा सोन्याचा गणपती - VIDEO

ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद

प्रसाद योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खासदार प्रताप चिखलीकर यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत आढावा बैठक

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

जिल्ह्यातील तब्बल 26 तीर्थक्षेत्रांवरील विविध विकास कामांना प्राधान्यक्रम

नांदेड l नांदेड जिल्ह्याला विविध तीर्थक्षेत्राची स्थळे लाभली असून यातील पावित्र्य जपत त्या-त्या तीर्थस्थळांच्या विश्वस्तांसमवेत चर्चा करुन केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत विकास केला जात आहे. जिल्ह्यातील तब्बल 26 तीर्थक्षेत्रांवरील विविध विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन येत्या 10 दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश खासदार प्रताप चिखलीकर यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांनी टप्पा 1 प्रणालीमध्ये सुचविल्याप्रमाणे सुमारे 26 कामे प्रस्तावित केले आहेत. या कामांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, रोहीत तोंदले, सर्व तालुक्यांचे उपअभियंता याबैठकीस उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात राहेर येथील नृसिंह मंदिरापासून माहूरच्या दत्त शिखर संस्थानापर्यंत प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणे असलेल्या तीर्थस्थळांवर नागरिकांची मोठी श्रध्दा आहे. कंधार तालुक्यातील बोरी (बु.) येथे लोअर मनार प्रकल्पाच्या जलाशयाच्या काठावर असलेले महादेव मंदिर व धरणाच्या पाण्यात साकारलेले बेट हे पर्यटनाच्या मोठ्या प्रमाणात संधी घेऊन उभे असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले. होट्टल येथील सिध्देश्वर मंदिर व परिसर, कोलंबी येथील 108 दत्त संस्थान प्रतिष्ठाण, गोरठा येथील श्री. संत दासगणु महाराज आदि विविध तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रत्येक संस्थानातील तीन कोटी रुपयांपर्यंतच्या विकास कामांचा आराखडा येत्या दहा दिवसात सादर केल्यावर त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल.

याचबरोबर जिल्ह्यातील काही तीर्थस्थळांना लागणारा निधी हा अधिक आहे. निधीच्या उपलब्धतेप्रमाणे जे काम अतिशय अत्यावश्यक आहे ती कामे व त्याच्या प्रस्तावावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील अनेक भागातील संस्थानावर भाविकांच्या श्रध्दा आहेत. नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथे साईबाबा संस्थान, कंधार तालुक्यातील गुंडा येथे नागबर्डी (नागदेवता) संस्थान पर्यटनासह पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाखमोलाचे आहे. याठिकाणी कोणत्याही वृक्षाचे साधे पानही तोडल्या जात नाहीत. लिंबाची असंख्य झाडी हे या स्थळांचे वैशिष्ट्य आहे. लोकांच्या श्रध्देसह पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्वाच्या असलेल्या अशा विचारांनाही आपण चालना दिल्या पाहिजेत, असे खासदार चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी यांनी हे काम अधिक पुर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग प्रमुखांना यावर तात्काळ कार्यवाही करुन वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे सूचना दिल्या.

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    by Rajesh Bhagwat
    May 11, 2025
    पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न छत्रपतींच्या… Read more: छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी
    by Rajesh Bhagwat
    May 10, 2025
    जळगाव | जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील… Read more: जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी
  • फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी
    by Rajesh Bhagwat
    May 10, 2025
    जळगाव | मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत… Read more: फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी
  • बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम… ३९ मचाणांद्वारे होणार प्राणीगणना
    by Rajesh Bhagwat
    May 10, 2025
    बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा, चितळ, भेकर, चौशिंगा, साळिंदर, नीलगाय,… Read more: बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम… ३९ मचाणांद्वारे होणार प्राणीगणना
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती
    by Rajesh Bhagwat
    May 9, 2025
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती… Read more: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (6)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,490)
  • Mahaparyatan Business (4)
  • Sports / क्रीडा (12)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (17)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (2)
  • कृषी पर्यटन (17)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (107)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (12)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (26)
  • प्राचीन देवस्थाने (52)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (34)
  • समुद्रकिनारे (16)
  • साहसी पर्यटन (6)
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismNanded tourismratnagiri tourismनांदेड
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In