Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कड्यावरचा सिध्दीविनायक गणपती  l VIDEO l

बहुउपयोगी बांबूची शेती फायदेशीर

मंत्रघोषाच्या जागरात श्रीदेव मंगळग्रह जन्मोत्सव साजरा l VIDEO l

कड्यावरचा सिध्दीविनायक गणपती l VIDEO l

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
460 14
0
652
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोकणातील समुद्र किनारी असलेल्या आंजर्ले गावातील प्रसिद्ध गणेशस्थान

आंजर्ले, दापोली l कोकणातले दापोली म्हणजे समुद्रकिनारे, घाटरस्ते, निसर्गाच्या कुशीत वसलेली सुंदर आणि प्रचीन देवस्थानं आणि असंख्य नयनरम्य नजारे असं चित्र डोळ्यांसमोर तरळून जातात. उंचीवर असल्याने इथे वर्षभर असलेले आल्हाददायक थंड हवामान आणि विशेष म्हणजे इथला कोकणमेवा पर्यटकांना पुन्हा पुन्हा आपल्या भेटीचे जणु आमंत्रण देत असतो.

प्रसिद्ध गणेश स्थान – याच दापोली शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर समुद्र किनारी वसलेले आंजर्ले हे निसर्गरम्य गाव आहे. कोकणातील हा परीसर सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या गावात एक प्राचीन स्वयंभु गणेशस्थान आहे ते म्हणजे कड्यावरचा सिद्धीविनायक गणपती. आंजर्ले गांवालगत पश्चिमेस असलेल्या टेकडीच्या कड्यावर हे स्थान आहे म्हणून हा गणपती  “कड्यावरचा  गणपती” या नावाने ओळखला जातो. मंदिराच बांधकाम माधवराव पेशवे यांच्या काळातलं असावं असं सांगितलं जातं.

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

येथे कसे यायचे – दापोलीहुन येतांना आंजर्ले गावालगत असलेल्या खाडीवर पूर्वी पूल नव्हता. त्यावेळी भाविक मंदिरात जाण्यासाठी नावेद्वारे खाडी पार करून जात असत. पुढे गावातून असलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढून येथे जावे लागत असे. आता मात्र खाडी पार करण्यासाठी नवीन पुलाची निर्मिती झाल्यामुळे थेट मंदिरापर्यंत आपल्याला वाहनाने जाता येते.

गणपतींचे पाऊलांकडे जाणारी चढणीची निसर्गरम्य वाट – गावातून मंदिराकडे येताना काही पायऱ्या चढून टेकडीवर आल्यावर आपल्याला एक छोटीशी देवळी दिसते. या घुमटीत कातळावर पावले उमटलेली दिसतात, ही पावले गणपतीची आहेत असे मानले जाते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः २०० पायऱ्या चढून जाण्याचे श्रम घ्यावे लागत असले तरी निसर्गाच्या साथीने आणि आपले आराध्य दैवत गणपतीच्या दर्शनाची ओढ यामुळे थोडासा दमणूक करणारा हा मार्ग नक्कीच सुखकारक ठरतो.

येथून दिसणारे नयनरम्य दृश्य – थोडासा विसावा घेतल्यानंतर आपण ज्यावेळी मागे वळून बघतो त्यावेळेस आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारे असे दृष्य दिसते. समोर अथांग पसरलेल्या समुद्राच्या ऐन मध्यात असलेला ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला आणि नारळी-सुपारीच्या बागेत लपलेले छोटेसे आंजर्ले गांव असा नयनरम्य देखावा आपल्याला ह्या घुमटीच्या जवळून बघावयास मिळतो.

मंदिर निर्मिती बद्दल अख्यायिका – फार पुर्वी आंजर्ले समुद्रकिनारी आंजर्लेश्वर शंकर व सिद्धिविनायक गणपती अशी दोन मंदिरं अस्तित्वात होती. कालांतराने समुद्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने ती बुडाली. त्यातील गणपतीचं मंदिर पुन्हा इथे या उंच जागी कड्यावर बांधलं गेलं असावं असं सांगितले जाते. हा कालखंड इ. स. १७६८ ते १७८० चा असावा असे गावकरी सांगतात.

गणपती मंदिर मार्ग – पाऊल असलेल्या देवळीपासुन पुढे बांधीव पाखाडीवरून काही अंतर चालत गेल्यावर आपल्याला मूळ मंदिरा पर्यंत जाता येते. उजव्या बाजुला लांबून दिसणाऱ्या आंजर्ले खाडी आणि त्यावरील पुल असा नजारा दिसतो. पुढे चालत गेल्यावर पुरुषभर उंचीची जांभ्या दगडाची तटबंदी असलेले देवळाचे विस्तीर्ण आवार लागते. आता मंदिरापर्यंत मोटार नेण्याची सोय करणारा रस्ता झाला असल्याने आपण थेट मंदिरापर्यंत पोहचू शकतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर पुजा साहित्य, न्याहारीची असंख्य लहान लहान दुकाने आहेत.

मंदिर परिसर – मंदिर प्राकारात मध्यभागी गणपती व त्या शेजारी हरिहरेश्वराचे म्हणजे भगवान शंकराचे मंदिर आहे. मुख्य मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे. या तलावात मुक्त विहार करणारे असंख्य कासव आहेत.

कड्यावरचा गणपती – मुख्यमंदिर मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर समोर शुभ्र शिखर असलेले सिद्धिविनायक मंदिर उभारलेले दिसुन येते. मोठा पत्रे घातलेला मोठा सभामंडप, सभागृह आणि गाभारा अशी मुख्य मंदिराची रचना आहे. मूळमंदिर साधारणपणे इ.स. ११५० मध्ये बांधण्यात आले तेव्हा मंदिराच्या बांधकामात लाकडीखांबांचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. इ.स. १७६८-१७८० या काळात मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. हे देवस्थान जागृत असून येथील गणपतीची मूर्ती चार हातांची असुन उजव्या सोंडेची आहे. साधारण पणे श्री गणेशाचा एक हात आशीर्वाद मुद्रेत असणे मात्र या गणपतीचा हात देणाऱ्या मुद्रेत असल्याने हा गणपती दाता गणेश म्हणुन प्रसिद्ध आहे. गाभाऱ्यातील गणेश मूर्ती ५ फूट उंचीची असुन सिंहासनाधिष्ठित आहे. हि मूर्ती काळ्या पाषाणातून घडविलेली आहे. मूर्तीच्या शेजारी रिद्धीसिद्धी यांच्या सुबक आकृत्या कोरलेल्या आहेत. बाप्पाचे मनोभावे दर्शन घेउन झाल्यावर भाविक भगवान् शंकराचे दर्शन घेतात.

हरिहरेश्वर मंदिर – मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुस भक्कम दगडी बांधकाम असलेले श्री हरिहरेश्वराचे छोटेसे मंदिर आहे. आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला श्री गणेशाची सुंदर मुर्ती असलेली छोटीशी देवळी आहे. पुढे गाभाऱ्यात काळया पाषाणातील सुबक शिवपिंडी आहे. हे देवस्थान ही पुरातन असल्याचे मानले जाते.

भक्तनिवास – मंदिर परिसरातील वातावरण खूपच शांत आणि आसपासचा परिसर अत्यंत रमणीय आहे. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजुस भक्तनिवासाची दोन मजली इमारत आहे. मंदिर संस्थान तर्फे येथे येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय अत्यंत अल्प दरात केली जाते. आधी कल्पना दिल्यास उत्तम घरगुती जेवणाची सोय ही केली जाते. आंजर्ले गावात अनेक घरात होम स्टे मध्ये ही घरगुती निवास, भोजनची सोय होऊ शकते. मंदिराचे आवार विस्तीर्ण असून मध्यभागी गणपती व डाव्या हाताला शंकराचे मंदिर आणि भक्तनिवास इमारत आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स मध्ये निवास करावयाचा असल्यास मुरूड, हर्णे चे पर्याय उपलब्ध आहेत.

श्रींची पुजा, अभिषेक, देणगी आणि भक्तनिवासाच्या माहितीसाठी चिन्मय काणे l फोन: ०२३५८-२३४३०० l येथे संपर्क साधावा

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,598)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismdapoli hotelsdapoli resortsIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismकड्यावरचा गणपतीदापोली
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In