Sunday, May 18, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मंत्रघोषाच्या जागरात श्रीदेव मंगळग्रह जन्मोत्सव साजरा l VIDEO l

कड्यावरचा सिध्दीविनायक गणपती l VIDEO l

कसं आहे इथलं पर्यटनस्थळ ? आपल्या काही सूचना आहेत का?

मंत्रघोषाच्या जागरात श्रीदेव मंगळग्रह जन्मोत्सव साजरा l VIDEO l

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
396 12
0
561
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक बाल स्वरूप श्रीदेव मंगळाचा जन्म सोहळा

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते पुजा आणि महाभोम याग संपन्न

अमळनेर : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त आज ५ सप्टेंबर रोजी मंत्रघोषाचा जागर करीत विधिवतरित्या जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. सौ. अनुराधा राऊत यांनी श्री मंगळग्रहाच्या मूर्तीवर विशेष पंचामृत अभिषेक केला. अत्यंत सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूप बाल श्री मंगळाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. देवाला ५६ भोग दाखविण्यात आला.

दरवर्षी प्रथेप्रमाणे श्री मंगळ जन्मोत्सवाला मंदिरावर नवे ध्वज लावले जातात. ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी वाजतगाजत नवे ध्वज मंदिरात आणले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, आनंद महाले, डी. ए. सोनवणे, सुनीता कुलकर्णी, उज्ज्वला शाह, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, कन्स्ट्रक्शन कन्सलटंट संजय पाटील, औरंगाबाद येथील विवेकानंद शिक्षण मंडळाचे सचिव तात्यासाो. श्रीमंत शिसोदे, संजयसिंह चव्हाण, किशोर व श्रीकांत उपाध्याय यांनी त्यांचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले. राऊत दांपत्याने ध्वजाचे व ध्वजाचे मानकरी असलेले पांडव दांम्पत्याचे औक्षण केले.

ध्वजपूजनानंतर त्यांना विधिवतरित्या कळसावर व मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले. माजी सैनिक असलेल्या मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी ध्वजवंदन केले.

महाभोमयागाचेही आयोजन – दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत मंदिरासमोरील सभामंडपात झालेल्या महाभोमयागाचे बिल्डर सरजू गोकलानी, बिल्डर प्रशांत निकम, इंजिनिअर हेमंत पाठक (सर्व रा. अमळनेर), शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पुनाजी पाटील (पिंपळे), बिल्डर महेंद्र श्रीराम पाटील (शिरूड), प्रगतिशील शेतकरी भगवान लटकन पाटील (जवखेडा), राहुल किशोर पाटील (अंतुर्ली), तापीराम दंगल पाटील (तासखेडा) व ग. स. बँकेचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील (जळगाव) आदी नऊ मान्यवर सपत्नीक मानकरी होते. महाभोमयोगाच्या प्रथेस या वर्षापासूनच मंदिरात प्रारंभ झाला आहे. श्री मंगळग्रहाचा शुभांक नऊ असल्याने नऊ मानकरी निमंत्रित करण्यात आले होते.

सायंकाळी सहा वाजता महाआरती झाली. दिवसभर भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. वेंकीज ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी शुद्ध गावरान तुपातील बालूशाहीच्या प्रसादाची मानकरी होती. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, यतीन जोशी, मेहूल कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.

  • छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    by Rajesh Bhagwat
    May 17, 2025
    छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंती निमित्त आयोजित विशेष… Read more: छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
  • यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात
    by Rajesh Bhagwat
    May 16, 2025
    ४९२ वन्यप्राणी-पक्षी,बिबट्यासह दुर्मीळ प्रजातींचे दर्शन…. २७ पेक्षा अधिक वन्यजीवांच्या प्रजातींची… Read more: यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात
  • जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
    by Rajesh Bhagwat
    May 16, 2025
    लेखापरिक्षण केलेले चौथ्या तिमाहीसह वार्षिक निकाल जाहिर जळगाव | मायक्रो… Read more: जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
  • फणस फळपीक संशोधन विकास केंद्र स्थापन करण्याबाबत मंत्रालय येथे बैठक संपन्न
    by Rajesh Bhagwat
    May 15, 2025
    फणस लागवड क्षेत्र वाढीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा – मंत्री… Read more: फणस फळपीक संशोधन विकास केंद्र स्थापन करण्याबाबत मंत्रालय येथे बैठक संपन्न
  • गडचिरोलीत वन पर्यटन विकसित करा – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
    by Rajesh Bhagwat
    May 14, 2025
    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून… Read more: गडचिरोलीत वन पर्यटन विकसित करा – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (6)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,497)
  • Mahaparyatan Business (4)
  • Sports / क्रीडा (12)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (17)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (2)
  • कृषी पर्यटन (17)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (108)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (12)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (26)
  • प्राचीन देवस्थाने (52)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (34)
  • समुद्रकिनारे (16)
  • साहसी पर्यटन (6)
Tags: agro tourismGandhi teerthIndia TourismJalgaon Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanmaharashtra tourismPlaces to be visited Near Jalgaonplaces to see near jalgaonratnagiri tourismमंगळग्रह मंदिर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Maha Tourism News

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

May 17, 2025
यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना  उत्साहात
Maha Tourism News

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

May 16, 2025
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
Maha Tourism News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 16, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In