Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान

स्वयंभू श्री अष्टवणे गणेश - VIDEO

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे गणेशोत्सवा निमित्त विविध उपक्रम

पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
405 4
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समाजासमोर गुणवान व्यक्तींचा आदर्श प्रस्तूत करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे l पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा आदर्श प्रस्तूत करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

३४ व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, उदयनराजे भोसले, हेमामालिनी, आमदार भिमराव तापकीर, माधुरी मिसाळ, अभिनेता सुनील शेट्टी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्ण कुमार गोयल, डॉ.सतीश देसाई आदी उपस्थित होते.

श्री.गडकरी म्हणाले, पुणे फेस्टीवलमधील पुरस्कारार्थीचा देशात गौरव आहे. पुण्याला विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, नाटक, साहित्य, साधना, शिक्षणाचा समृद्ध वारसा असून हे वैभव पुढे नेणे महत्वाचे आहे. ही शहराची खऱ्या अर्थाने समृद्धी आहे आणि ती जपण्याचे कार्य पुणे फेस्टिवलने केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व समाजासमोर आले आहेत.पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. म्हणून इथे घडणाऱ्या घटनांचा परिणाम देशात होत असतो. इथल्या महापुरुषांनी देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. समाज परिवर्तनासाठी नृत्य, संगीत, कला, क्रीडा अत्यंत आवश्यक आहे. या सर्व घटकांमध्ये एक संस्कार असून त्यांचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून अशा बाबींना प्रोत्साहन देण्यात येवून हा उत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोविण्यात यश आले आहे.

पुण्याचे विमानतळ, मेट्रो यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. दीड लाख कोटींची कामे या परिसरात करण्यात येत आहेत. पुण्याच्या रिंगरोडचे कामही सुरू करण्यात येणार आहे. पालखी मार्गाच्या कामालाही गती देण्यात येत आहे. १२ हजार कोटी रुपये खर्च करून हा मार्ग पूर्ण होणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असेल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्री.फडणवीस म्हणाले, गेल्या ३४ वर्षात पुणे फेस्टिवलने पुण्याला वेगळी ओळख दिली आहे. परकीय आक्रमणकर्त्याने पुणे बेचिराख केले आणि गाढवांचा नांगर इथे फिरवला. आई जिजाऊंच्या आशिर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला आणि तेव्हापासून इथे नररत्नांची खाण सुरू झाली. पुण्यात एकापेक्षा समाज बदलणारे आणि खऱ्या अर्थाने लोकांना प्रेरणा देणारे सर्व क्षेत्रातले लोक पहायला मिळतात.

आज आपण व्हर्चुअल डिजीटल युगात आहोत. या युगात आपण प्रत्येकाची अभिव्यक्ती रेकॉर्ड करून व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर टाकतो. ३४ वर्षापूर्वी अशी सुविधा नसताना सर्व गुणांची प्रत्यक्ष अभिव्यक्ती प्रेक्षकांसमोर ठेवणाऱ्या पुणे फेस्टीवलची सुरूवात करण्यात आली. इथे ज्यांचा गौरव होतो ते आपल्या क्षेत्रात खूप पुढे जातात, असे त्यांनी सांगितले. पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे. सर्वच पुरस्कारार्थींनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य केल्याचेही ते म्हणाले.शतकोत्तर प्रवास पूर्ण केलेल्या नवचैतन्य गणेश मंडळ डेक्कन जिमखाना आणि शुक्रवार पेठ येथील राजर्षी शाहू गणेश मंडळांचा यावेळी श्री.गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. पुणे फेस्टिवलच्या प्रवासावर आधारीत स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार यांना पुणे फेस्टिवलचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे ॲड.एस.के.जैन, डॉ.भूषण पटवर्धन, लेखिका सई परांजपे, कलाकार प्रविण तरडे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल देशपांडे यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यावेळी खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, पुणे फेस्टिवल व माझे घनिष्ठ नाते आहे. नवनवीन कलाकारांना या फेस्टिवलच्या माध्यमातून संधी देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

खासदार श्री. भोसले यांनी, पुणे फेस्टिवलपासून प्रेरणा घेवूनच आपल्या महाविद्यालयीन जीवनात गणेश फेस्टिवलची सुरुवात केल्याची आठवण सांगून पुणे फेस्टीवलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ लेखिका सई परांजपे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.प्रारंभी अभिनेत्री हेमामालिनी यांनी गणेश वंदनावरील नृत्य सादर केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त ‘हमारा अतुल्य भारत’ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. भावपूर्ण व भक्तीपूर्ण वारी देखावा, लावणी, भांगडा, घुमर नृत्यासोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.भारतरत्न स्व.लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, पंडित शिवकुमार शर्मा, यांना गीताच्या माध्यमातून स्वर स्वरांजली वाहिली.

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही,… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,600)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismपुणे फेस्टिवल
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In