Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
स्वयंभू श्री अष्टवणे गणेश – VIDEO

भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण

पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान

स्वयंभू श्री अष्टवणे गणेश – VIDEO

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
436 4
0
606
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समुद्रकिनारी असलेल्या गुहागर गावच्या पश्चिमेस असलेल्या डोंगरावरचा गणपती…..

निसर्गरम्य ठिकाणी एकांतात असलेल्या गणेश मंदिराला एकदातरी दर्शनासाठी जायलाच हवं !!!

l वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

गुहागर…..  दाभोळची खाडी ते जयगडची खाडी असा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेले रत्नागिरी जिल्ह्यातले तालुक्याचं ठिकाण. गुहागर हे गाव पुण्यापासून सुमारे दोनशे नव्वद किलोमीटर आणि मुंबईहून दोनशे पंचाहत्तर किलोमीटरवर आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या अलीकडं परशुराम घाट उतरल्यानंतर उजवीकडे वळून, पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गुहागर गावात आपण पोहोचू शकतो. 

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

गुहागर ते असगोली असा सात किलोमीटर लांबी लाभलेला समुद्रकिनारा म्हणजे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ, शांत असून इथल्या मऊ वाळूतून चालताना तासंतास कसे निघून जातात ते समजतच नाही. लाल मातीत नागमोडी वळणे घेत जाणारे अरुंद रस्ते, नारळी पोफळीच्या झाडांमध्ये लपलेली कौलारू घरे, प्राचीन देवस्थानं हे गुहागरचं वैशिष्ठ्य. 

श्री देव व्याडेश्वर, श्री दुर्गादेवी, उफराटा गणपती, वारदंबिका / कार्तिक स्वामी मंदिर, कोपरी नारायण मंदिर अशा प्राचीन देवस्थानांमुळे गुहागर गाव देवभूमी म्हणूनही ओळखलं जातं.

गुहागर गावाच्या पूर्वेस असलेल्या उंच डोंगरावर वसलेल्या, मात्र पर्यटकांसाठी थोड्याशा अपरिचित असेल्या, अष्टवणे गणेशाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मुसळधार पावसात आमच्या कॅमेरा टीमने छत्रीचा आधार घेत या निसर्गपूर्ण स्थळाचे चित्रीकरण केलंय ते आपल्या पर्यंत पोहोचवत आहोत. चला तर मग, मुसळधार पावसात, श्री अष्टवणे गणेशाच्या दर्शनाला.

गुहागरच्या वरचा पाट भागात असलेल्या कार्तिक स्वामी मंदिराशेजारून जाणाऱ्या रस्त्याने पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला भातशेतीने वेढलेल्या पटांगणात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचे भव्य शिखर आपले लक्ष वेधून घेते. पाखाडीवरून पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेल्या पायऱ्यांपासून डोंगर चढणीस सुरुवात होते. 

आजूबाजूला दिसणारी खास कोकणी शैलीतील कौलारू घरं, सारवलेल्या अंगणात असलेले तुळशीवृंदावन आपल्या दृष्टीस पडते. दुतर्फा असलेल्या नारळ, सुपारी , आंबा , फणस काजूच्या झाडांमध्ये लपलेली ही वाट, मनाला भुरळ पडावी अशीच आहे. 

पायऱ्या चढून वर जातांना अष्टवणे गणेश मंदिराचे पांढरेशुभ्र शिखर आपले लक्ष वेधून घेते. पंधरा ते वीस मिनिटांच्या चढणीनंतर दाट झाडीत असलेल्या नितांत सुंदर आणि रम्य अशा अष्टवणे गणेश स्थानावर आपण येऊन पोहचतो. स्वच्छ परिसर , निरव शांतता यामुळे चढण चढतांना आलेला थकवा कुठल्याकुठे निघून जातो.

डाव्या हाताला अखंड प्रवाहित असलेला झरा गोमुखातून सोडण्यात आल्याचे बघायला मिळते. थोडं पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण मुख्य मंदिरात पोहोचतो. चकचकीत टाईल्स लावून बांधलेले सभागृह आणि पुढे कळसाखाली छोट्याशा दगडी घुमटीतील सुबकशी स्वयंभू गणेश मूर्ती असलेला गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. सभागृहातील भव्य झुंबर, विविध रंगसंगतीत LED दिव्यांची प्रकाश व्यवस्था आपले लक्ष वेधून घेते.  

शेंदरी रंगातील अंदाजे दोन अडीच फूट उंचीच्या गणेशमूर्तीच्या कपाळावर चंद्रकोर कोरलेली दिसते. मूर्तीच्या पुढ्यात मोदक ग्रहण करणारा पितळी उंदीर आहे. नवसाला पावतो अशी या गणेशाची ख्याती असल्याने अनेक भाविक इथे दर्शनाला येत असतात. जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या अष्टवणे गणेशाचे महत्त्व एवढे आहे की मंदिरात संकष्टी, अंगारकी चतुर्थीला आणि प्रत्येक मंगळवारी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. अभिषेक, पूजाअर्चा आणि देणगीसाठी श्री अष्टवणे गणेश मंदिर संस्थान यांच्याशी संपर्क साधावा.

दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातून आपण पश्चिमेकडे जेव्हा बघतो तेव्हा दूर क्षितिजावर समुद्राच्या लाटांमुळे निर्माण होणाऱ्या चंदेरी रेषा, किनाऱ्यावरील आभाळाला भिडलेली नारळ पोफळीची झाडे, आकाशात उडणारे असंख्य पक्षी, हे मनोहारी दृश्य नजरेसमोरून जातच नाही.  

गुहागर गाव हे तालुक्याचं ठिकाण असल्याने येथे भोजन निवासाची उत्तम सोय होऊ शकते . या परिसरात फिरण्यासारखी अनेक स्थळं आहेत. एका दिवसात आपण श्री देव वेळणेश्‍वर, हेदवी गणपती मंदिर, बामणघळ या ठिकाणांना भेटी देऊन आपण परत गुहागरला मुक्कामी येऊ शकतो.

गुहागर ते असगोली असा सात किलोमीटर लांबी लाभलेला समुद्रकिनारा म्हणजे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ, शांत असून इथल्या मऊ वाळूतून चालताना तासंतास कसे निघून जातात ते समजतच नाही. लाल मातीत नागमोडी वळणे घेत जाणारे अरुंद रस्ते, नारळी पोफळीच्या झाडांमध्ये लपलेली कौलारू घरे, प्राचीन देवस्थानं हे गुहागरचं वैशिष्ठ्य. 

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,598)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismAshtavane GaneshIndia Tourismkokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIगुहागरगुहागरचा प्रसिद्ध गणपती
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In