Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
काजू प्रक्रियेतून महिला बचत गट आर्थिक दृष्ट्या होताहेत स्वयंपूर्ण

वाळूची टेकडी - Video

राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली येणार

काजू प्रक्रियेतून महिला बचत गट आर्थिक दृष्ट्या होताहेत स्वयंपूर्ण

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
409 4
0
568
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काजूच्या राहिलेल्या तुकड्यांमधून काजू मोदक, बर्फी, लाडू, खारे काजू, मसाला काजू इ. उत्पादनाना मिळत आहे नवीन बाजारपेठ

महिला आर्थिक विकास महामंडळ, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी द्वारा संचलित सातार्डा, घोगळवाडी येथील यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांची आर्थिक बाजू स्वयंपूर्ण केली आहे.

महिला बचतगट म्हटल की आपसूकच लोणची पापड, मसाले ही उत्पादने समोर येतात. परंतू याला फाटा देत यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योग यशस्वी केला आहे. काजू बी खरेदीपासून त्याच्या विविध प्रतवारी नुसार विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवत आहे.

शिवाय काजूच्या राहिलेल्या तुकड्यांमधून काजू मोदक, बर्फी, लाडू, खारे काजू, मसाला काजू अशा उत्पादनानेही बाजारपेठ मिळवली आहे. याबाबत राजश्री परितपते यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, 2007 साली माविम अंतर्गत आमचा महिला बचतगट स्थापन झाला. या बचत गटात 10 महिला असून 2012 ला सेंट्रल बँकेकडून 2 लक्ष 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जातून सुरुवातीला 2 ते 3 वर्ष आम्ही काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. परंतु त्यामधील मार्केटिंगची बाजू हाताळण्यासाठी सीएमआरसीचे सहकार्य आणि मार्गदर्शन घेतले.

कसे तयार होतात खाण्यालायक काजू, जाणुन घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा

सद्या अन्य महिला बचतगटातील शेतकरी महिलांकडून आम्ही काजू बी खरेदी करतो. बाजारभावापेक्षा एखादा रुपया जादा देत अशा काजू बी वर प्रक्रियाकरून स्वयंचलित कटरवर कट करतो. आतील काजूगर ड्रायरवर वाळवण्यात येतो. त्यानंतर त्याची प्रतवारी करण्यात येते. या प्रतवारीनुसार त्याचा दर ठरतो. असे तयार काजू आकर्षक वेष्टनामधून घाऊक तसेच किरकोळ स्वरुपात विक्री केला जातो.

ही प्रक्रिया करत असताना काही प्रमाणात काजू कणी आणि तुकड्याच्या स्वरूपात काजू तयार होतो. या पासून सद्या गणेशोत्सवासाठी मोदक, बर्फी, लाड असे पदार्थ बनवण्यात येत आहेत. या पदार्थांनाही बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने गटाला आर्थिक उत्पन्न मिळत आहे. काजू प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांनाही चांगला रोजगार दिला जातो.

सुरुवातीला घरातील पुरुष मंडळींकडून पैसे घ्यावे लागायचे परंतु सद्यस्थितीत काजू प्रक्रिया उद्योगाने आम्हा महिलांना आर्थिक उत्पन्न देऊन स्वयंपूर्ण बनवले आहे. एकूणच यशस्वी स्वयंसहाय्यता महिलांच्या हा काजू प्रक्रिया उद्योग यशस्वी झाला असून या यशगाथेची प्रेरणा जिल्ह्यातील अन्य बचतगटांच्या महिलांनी घ्यायला हरकत नाही….. प्रशांत सातपुते l जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग….

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismplaces to visit near Ratnagiriकाजूकाजू प्रक्रिया उद्योगसिंधुदुर्ग
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In