Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
वाळूची टेकडी – Video

चिखलगाव - लोकमान्य टिळकांचे मूळ गाव Video

काजू प्रक्रियेतून महिला बचत गट आर्थिक दृष्ट्या होताहेत स्वयंपूर्ण

वाळूची टेकडी – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
425 4
0
590
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
हा व्हीडिओ जरूर बघा

पंधराशेच्या दशकात त्सुनामी मुळे कोकणात झाली निर्मिती

नामशेष होत असलेल्या या वाळूच्या टेकडीचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे

येथे कसे जायचे – कोकणातील दापोली तालुक्यातील केळशी हे एक निसर्गरम्य गाव. केळशी हे गाव पुण्यापासून १९० किलोमीटर (पाच तास) आणि मुंबईहून २२० किलोमीटर (साडेपाच तास) अंतरावर आहे.

केळशी गाव आणि परिसर – येथील गर्दी नसलेला आणि निवांत समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकांमध्ये हे गाव प्रसिद्ध आहे. केवड्याचे बन, शंख, शिंपले, कवड्या, समुद्रफेणी, निरनिराळ्या आकारांची समुद्रप्राण्यांची घरे ही देखील केळशीच्या समुद्रकिनाऱ्यावर पहायला मिळतात. त्याच बरोबर प्राचिन असे स्वयंभू श्री महालक्ष्मी मंदिर, याकूब बाबा दर्गा, वाळूची टेकडी, समुद्रात असलेले खडप (खडकाळ किनारा) जेथे असंख्य आकारातील शंख शिंपले आढळून येतात. या ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देतात. केळशितील वाळूच्या टेकडीची माहिती वरील व्हिडीओत आपण जाणुन घेणार आहोत.

अशी झाली निर्मिति – केळशीचा समुद्रकिनारा वाळुच्या डोंगरासाठी (sand dunes) प्रसिध्द आहे. कोकणात असा वाळुचा डोंगर अन्यत्र कोठेही बघायला मिळत नाही. केळशी गावच्या पश्चिमेस असलेली वाळूची टेकडी म्हणजे निसर्ग निर्मित चमत्कारच म्हणावा लागेल. भारजा नदी जेथे समुद्रास मिळते त्या परिसरात ही भलीमोठी वाळूची टेकडी आहे. समुद्राकडून म्हणजेच पश्चिमेकडून येणाऱ्या वादळापासून रक्षण करणारी ही नैसर्गिक भिंत नामशेष झाल्यास केळशी गावाला भविष्यात धोका पोहचू शकतो.

अंदाजे पंधराव्या शतकात तत्कालीन भारतात आणि आताच्या पाकिस्तानात आलेल्या त्सुनामीमुळे या परीसरात त्यावेळेस उठलेल्या वाळूच्या वादळाची (sand storm) वाळू या ठिकाणी बसली. आणि वाळूचे डोंगर किंवा टेकडीची निर्मिति झाली. अशा सात वाळूच्या टेकड्यांवर आताचे केळशी गाव वसलेले आहे.

वाळूच्या टेकडीखाली दडलेला खजिना शोधण्यासाठी होते गर्दी – त्यावेळेस केळशी परीसरात मालगुजर समाजाची वस्ती येथे होती. ती पूर्णपणे वादळामुळे गाडली गेली असल्याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत. माल गुजर समाज फिरस्ती करत विवीध वस्तू विकत असत आणि त्यातून झालेल्या उत्पन्नात अपला उदरनिर्वाह करत असत. आपली संपत्ती, चीजवस्तू मातीच्या रांजणात किंवा भिंतीत दडवून ठेवले जायचे. त्या सगळ्या चीजवस्तू वाळू खाली पुरल्या गेल्या होत्या. या डोंगराखाली गाडली गेलेली सोन्याचांदीची नाणी, दागिने, जूनी भांडी, मातीच्या वस्तूंचे आणि एक पुरातन विहिरीचे अवशेष आढळून आले आहेत.

नामशेष होतोय हा निसर्गाचा चमत्कार – याला अनेक कारणे आहेत.

१) वेळोवेळी येणारी वादळे, जास्तीची भरती ओहटी यामुळे या वाळूंच्या टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला अठरा मीटर उंची आता झिजून फक्त आठ मीटर उंचीची झालेली आहे.

२) उत्सुकतेपोटी किंवा चोरीच्या उद्देशाने येथे अनेक जण येत असतात. त्यामुळे करण्यात येत असलेले अवैध उत्खनन धोकादायक ठरत आहे.

३) प्रस्तावित कोस्टल हायवेवर वेळास आणि केळशीला जोडणाऱ्या रस्त्यावर एका पुलाच्या निर्मिती केली जात होती. वाळूच्या टेकडीवर या पुलाचा लँडिंग पॉईंट असल्याने सूरु झालेल्या बांधकामामुळे मुळात १८ मीटर उंची असलेली ही टेकडी १० मीटरने कमी झाली. कालांतराने हे काम अर्धवट स्थितीत बंद करण्यात आले आहे.

४) ज्याप्रमाणे वाळूच्या टेकडीचा उंची कमी झाली आहे त्याचप्रमाणे रुंदिही जवळपास ऐंशी ते शंभर मीटरने कमी झाली आहे. वरील सर्व करणामुळे शासनाने विशेष लक्ष देउन संरक्षक भिंत उभारून अथवा विविध उपाय योजना करून या डोंगराचे संवर्धन आणि जतन करण्याची मागणी स्थानिक गावकरी करत आहेत.

आता हा डोंगर म्हणावा तेवढा पूर्व स्थितीत राहिलेला नाही.. पण हा परिसर म्हणजे जिथे भारजा नदी समुद्राला मिळते तो अतिशय प्रेक्षणीय आणि बघण्यासारखाच आहे.

केळशी येथे चुलीवर तयार करून देणाऱ्या स्थळाची माहितीसाठी हा व्हीडिओ बघा l पूर्व कल्पना दिल्यास येथे उत्तम शाकाहारी मासाहारी भोजनाची व्यवस्था होऊ शकते

निवास भोजन व्यवस्था – केळशी गाव पुण्यामुंबई पासून अंदाजे पाच तासांच्या अंतरावर असल्याने पर्यटकांची पावले केळशीकडे वळू लागली आहेत. गावात होम स्टे, रिसॉर्ट्स, वाडी स्टे आहेत. ऑनलाईन बुकिंग करून किंवा आधी कल्पना दिल्यास निवास भोजनाची चांगली सोय येथे होऊ शकते. स्थानिक कोकणी पदार्थांसह शाकाहारी, मासाहारी आणि मत्स्याहारी जेवणाची छान सोय मागणीनुसार केली जाते. परिसरात दोन तीन दिवस मुक्काम करून कोकणी जीवनशैलीचा अनुभव आपण घेऊ शकतो.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismकेळशीदापोलीवाळूची टेकडी
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In