Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे’ पुण्यात उद्घाटन

शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला, कृषिउद्योजकांना चालना देणाऱ्या फालीचे जैन हिल्स येथे आयोजन

कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे भविष्यात महत्त्वाचे ठरणार

‘सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे’ पुण्यात उद्घाटन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
June 1, 2022
408 4
0
567
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

सागरी क्षेत्रातील संधींकडे युवकांनी सकारात्मकतेने पहावे… उपमुख्यमंत्री अजित पवार

तरुण पिढीला नौदल, व्यापारी नौदल, तटरक्षक दल, जहाजबांधणी, बंदरे, सागरी क्षेत्रातील तेलविहिरी, नैसर्गिक वायू प्रकल्प आदी विविध संधींची माहिती व्हावी या उद्देशाने या संग्रहालयाची उभारणी

Agastya Sea View Apartments, Dapoli

पुणे l प्रतिनिधी l भारताला आणि महाराष्ट्राला समृद्ध सागरी किनारा लाभलेला असून नौदल, सागरी प्रवासी वाहतूक, व्यापारी वाहतूक, मासेमारी आदी मोठ्या संधी असलेल्या या क्षेत्राकडे युवकांनी व्यवसाय, रोजगाराच्या संधी म्हणून सकारात्मकपणे पाहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अनंतराव पवार अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद आणि इंडियन मेरिटाईम फौंडेशनच्यावतीने (आयएमएफ) स्थापन करण्यात आलेल्या ‘सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे’ उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वेकफिल्ड फूड्स प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश मल्होत्रा, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदच्या महासचिव प्रमिला गायकवाड, ‘आयएमएफ’चे प्रेसिडेंट एमिरट्स कमांडर राजन वीर, अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित आदी उपस्थित होते.

जगातील ९५ टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता सागरी क्षेत्रामध्ये आहे. बंदरांच्या विकासासाठी खासगी क्षेत्र पुढे येत आहे. सागरी क्षेत्र खडतर असले तरी भक्कम पगार, आर्थिक बळ देणारे असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याकडे वळले पाहिजे.

कोकणातील पहिली भव्य शिवसृष्टी – Video

अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेले सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्र विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन यासाठी उपयुक्त ठरण्यासह रोजगाराला चालना देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी स्थापन केलेल्या मराठा आरमाराची माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून संग्रहालय मोठ्या जागेत नेण्यासह जहाजाच्या प्रतिकृती, त्या काळातील जहाजांवरील उपकरणे ठेवण्यासह आदी आवश्यक सुधारणांसाठी आवश्यक निधी ‘कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व’ (सीएसआर) निधी आदींच्या माध्यमातून निश्चितपणे निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सागरी क्षेत्राचे महत्त्व ओळखून जलशक्ती, जलवाहतूक, जलसिंचन, बंदरांच्या उभारणीला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या विकासासाठी तसेच वर्चस्वासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी बंदरांचा विकास, जलमार्गांचा विकास, जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले होते. तसेच धोरण त्यापुढील काळातही राबवण्यात आले, असेही श्री. पवार म्हणाले.

देशामधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा हा महत्त्वाचा मुद्दा बनला असून महाविद्यालयांमधून १५  लाखापेक्षा अधिक अभियंते शिकून बाहेर पडतात. तथापि, यापैकी केवळ १ लाख विद्यार्थ्यांनाच आपल्या आवडीच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नोकरी, रोजगाराच्या संधी मिळतात. उर्वरित १४ लाख विद्यार्थ्यांना तडजोड करुन अन्य क्षेत्रात रोजगार शोधावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत असून रोजगार पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी योग्य दिशा निवडली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कॅ. दीक्षित म्हणाले, तरुण पिढीला नौदल, व्यापारी नौदल, तटरक्षक दल, जहाजबांधणी, बंदरे, सागरी क्षेत्रातील तेलविहिरी, नैसर्गिक वायू प्रकल्प आदी विविध संधींची माहिती व्हावी या उद्देशाने हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्रात रोजगाराकडे वळण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संस्थेच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या ‘टेक ट्रान्सफर बुकलेट’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव प्रमिला गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत सुतार, सहसचिव संदीप कदम, भगवानराव साळुंके, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील ठाकरे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते l

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismPlaces to visit near punePune Tourismइंडियन मेरिटाईम फौंडेशनसागरी क्षेत्रसागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्र
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In