Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे कांदळवनाचा ऱ्हास म्हणजे मुंबई शहरासाठी चिंतेचे कारण

कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य l पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे

‘देदीप्यमान महाराष्ट्र’ मासिकाच्या पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन

झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे कांदळवनाचा ऱ्हास म्हणजे मुंबई शहरासाठी चिंतेचे कारण

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 26, 2022
407 5
0
566
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

समुद्राची वाढती पातळी आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून मुंबईला वाचविणे गरजेचे

मुंबई महानगरपालिका आणि प्रकल्प मॅन्ग्रोव्ह सेल यांच्या संयुक्त विद्यमाने एक पथदर्शी प्रकल्प

Agastya Sea View Apartments, Dapoli

मुंबई l प्रतिनिधी l जैवविविधतेच्या दृष्टीने कांदळवनाचे (मॅन्ग्रोव्हस) महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि प्रकल्प मॅन्ग्रोव्ह सेल यांच्या संयुक्त विद्यमाने एक पथदर्शी प्रकल्प लवकरच होणार आहे. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व एन्व्हायर्मेंट रिसर्च फौंडेशन यांच्या वतीने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या संबंधित इतर एजन्सींमधील समन्वय सुलभ होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, ‘महाप्रित’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी,  निवृत्त सनदी अधिकारी तथा ERAF चे संचालक अजित कुमार जैन,  महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, मॅन्ग्रोव्ह सेलचे श्री. एम. आदर्श रेड्डी, ‘महाप्रित’चे मुख्य महाव्यवस्थापक (पर्यावरण) एस. सी. कोल्लूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Indian Tiger Fight – दोन वाघांची झुंज – Video

झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे कांदळवनाचा ऱ्हास हे मुंबई शहरासाठी चिंतेचे कारण बनले आहे. विशेषत: समुद्राची वाढती पातळी आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून शहराला वाचविणे गरजेचे आहे. किनारपट्टीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने कांदळवनाचे महत्त्व नाकारता येणार नाही. अनियोजित विकास, कचऱ्याची अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट, विशेषत: किनारपट्टीच्या भागात आणि कांदळवनाची झाडे जाळणे ही या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. या प्रकल्पाद्वारे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट (MSW) आणि कांदळवनाच्या अधिवासातून बांधकाम आणि विध्वंस (C&D) कचरा काढून त्यांचे पुनर्वसन सुलभ करण्यासाठी योजना विकसित केली जाणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर प्रभागातील कांदळवनाच्या हॉटस्पॉटसाठी प्रस्तावित आहे. या प्रकल्पामध्ये MSW आणि C&D कचऱ्याचे प्रमाणीकरण, कांदळवनापासून कचरा काढून टाकण्यासाठी योजना विकसित करणे आणि मोक्याच्या ठिकाणी चेकपोस्ट (चौकी) स्थापन करून पुनर्वसित ठिकाणी या कचऱ्याचे भविष्यात डंपिंग रोखणे यांचा समावेश आहे. योग्य पद्धतीने योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी संबंधित विभाग आणि एजन्सींचे समन्वयन हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या, कांदळवनाच्या संवर्धनाचे महत्त्व आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कांदळवन संवर्धन समितीची भूमिका विशद केली. कांदळवनातील कचरा काढण्याची कोणतीही योजना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या समितीकडे सादर केल्यास ती लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल, अशी सूचना त्यांनी केली.

‘महाप्रित’चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी महाप्रित आणि EARF यांनी राबवलेल्या कांदळवन संवर्धन प्रकल्पाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रकल्प रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात घेण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली. महाप्रित कंपनीची पार्श्वभूमी आणि उपक्रम याबाबत उपस्थितांना माहिती दिली.

ERAF चे संचालक अजित कुमार जैन यांनी कांदळवन संवर्धन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सादरीकरण केले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात निदर्शनास आणल्याप्रमाणे देशभरात आढळून आलेले हवामान बदल आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत असामान्यपणे वाढ होत असताना कांदळवनाचे संवर्धन करण्याची निकड त्यांनी नमूद केली.

Shri Ashtavne Ganpati Temple, Guhagar, Ratnangiri,
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
समुद्रकिनारी निसर्गरम्य ठिकाणी देव दर्शनाला जायलाच हवे असे श्री कालिकादेवी आणि भगवान श्री शंकराचे देवस्थान
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismmaharashtra tourism departmentMangrove SafariMumbai in dengerकांदळवन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In