Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
Indian Tiger Fight – दोन वाघांची झुंज – Video

मुंबईत जागतिक मोटर बोट फॉर्म्युला-१, H२O पॉवर बोट चॅम्पियनशीप स्पर्धा

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

Indian Tiger Fight – दोन वाघांची झुंज – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 14, 2022
418 18
0
599
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

ताडोबात खुल्या जीपने केली जाणारी टायगर सफारी ठरत आहे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू

Watch Real Tiger Fight Video

टायगर सफारीचे ऑनलाईन बुकींग करुन आम्ही निघालो व्याघ्र दर्शनाला – मी (निनाद भिडे) आणि माझे दोन सहकारी आम्ही ताडोबा जंगलात सफरीचा बेत ठरवला. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की जंगलात वाघ बघायला जायचं. पण कामाच्या व्यास्तेतेमुळे ते शक्य होत नव्हते, पण एकदा लागून सुट्टी असल्याने मी प्लॅन केली ताडोबा सफर.

आम्ही मोहार्ली गेट बफर झोन मध्ये असलेली सफारी ऑनलाईन बुक केली. या सफारीत खुल्या जीप मधून जंगलात फिरवून यायला अंदाजे चार तास लागतात.

गाईड सुनील, त्याचा जीप चालक सहकारी आणि आम्ही तिघे असे पाच जण भल्या सकाळी निघालो. उन्हाळा असूनही हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. आमचा एकच उद्देश होता वाघ बघण्याचा.

गाईड सुनील याने सुरुवतीला या टायगर सफरीबद्दल महिती दिली. ताडोबात वाघ पाहण्याची शक्यता भारतात सर्वाधिक असते. वाघ म्हणजेच टायगर किंवा कोणताही प्राणी, पक्षी पाहणे/दिसणे पूर्णपणे नशिबावर अवलंबून असते. त्याबद्दल मात्र हमी दिली जात नाही.

ताडोबामध्ये पट्टेरी वाघाबरोबरच आपण ब्लॅक पँथर, बिबळ्या, नीलगाय, चितळ, हरण, सांबर, अस्वल, साळींदर, अस्वल, भेकर, रानमांजर, जंगली कुत्रे, खवले मांजर, चौशिंगा, रानगवा यासह इतर अनेक जंगली प्राणी पाहू शकतो. तसेच ताडोबामध्ये शेकडो प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळू शकतात. येथिल गाईड आणि ड्रायव्हर आपल्याला व्याघ्रदर्शन व्हावे म्हणुन पूर्णपणे प्रयत्न करतात हे मात्र नक्की.

माधुरी नावाची वाघीण त्या एरियात कालच बघितली गेली असल्याचं सांगितलं. वाघ दिसण्याची दाट शक्यता असल्याने आम्ही उत्साहात मार्गक्रमण करू लागलो.

या टायगर सफारी दरम्यान आम्ही मोर, रानडुकरे, हरणांचा कळप, बारा शिंगा, नीलगाय, अस्वल, रान गवा आणि अनेक प्रकारचे असंख्य पक्षी आम्हाला बघावयास मिळाले. मात्र वाघ काही दृष्टिपथास येत नव्हता.  आम्हाला वाघ केव्हा दिसतो याची उत्सुकता लागून होती.

वाघाचे पगमार्क्स आणि विविध प्राण्यांचे कॉल यावरून यावरून अंदाज घेत आम्ही पुढे निघालो – पहिल्यापासूनच गाईड सुनीलने सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. आम्हाला सावध होण्यारोबरच आवाज नं करण्याची सूचना दीली. वाघाचे पगमार्क्स आणि विविध प्राण्यांचे कॉल यावरून यावरून अंदाज घेत आम्ही पुढे निघालो. अचानक सुनीलने आम्हांला सतर्क राहण्याचा इशारा दिला कारण वाघ त्याच्या नजरेच्या टप्प्यात आला होता. आम्ही त्याने दाखवलेल्या दिशेस आम्ही बघितले आणि एक वाघ झाडांच्या सावलीत बसलेला असल्याचे दिसून आले.

सुरू झाली रियल टायगर फाईट – दुसऱ्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. आयुष्यात प्रत्यक्षात वाघ समोर, डरकाळ्या हे सर्व आम्ही पहिल्यांदाच अनुभवत होतो. क्षण बाका होता, अचानक उजव्या बाजूच्या जाळीतून दुसरा वाघ आम्हाला दिसला. तो पाहिल्या वाघाकडे गुरगुरत येत होता. आणि अचानक त्याने बसलेल्या वाघावर हल्ला चढवला आणि सुरू झाली रियल टायगर फाईट. दोन्ही पूर्ण वाढीचे वाघ एकमेकांना थेट भिडले. मागील पायांवर उभे राहत पंजांनी इजा करण्याच्या उद्दशाने एकमेकांवर वार करणे सुरू झाले. वाघांच्या डरकाळ्यानी परिसर दणाणून सोडला. आम्ही स्तब्ध होऊन आम्ही हा प्रसंग बघत होतो. या घटनेचे साक्षीदार झालो याचा आनंद जरूर होत होता. अवघ्या काहीच क्षण चाललेली ही फाईट आमच्या कॅमेरात आम्ही टिपून ठेवली. तेच क्षण आपल्याबरोबर शेअर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघावा…. Wild Video’s by – निनाद भिडे

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismChandrapurIndia TourismIndian tiger FightkonkanMahaparyatan.commaharashtra tourismNagpurWild lifeताडोबा अंधारीबफर झोन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In