Wednesday, September 16, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
ऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीच्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात खानदेशातील तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

५ कोटींचा व्यवसाय करणारे कोंकणातील छोटेसे गाव - Video

युवकांनो ! 'या' आहेत पर्यटन व्यवसायात संधी……

ऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीच्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात खानदेशातील तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 4, 2022
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

एकाच वेळी खान्देशातील तीन जणांना हा बहुमान मिळणे ही खूप आनंदाची, अभिमानाची आणि समाधानाची… अशोकभाऊ जैन : अध्यक्ष, जैन इरिगेशन

जळगाव – दिल्ली येथील ऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीच्या ९३व ९४ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात खानदेशातील तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक मिळाले. जळगावमधील जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार विकास मल्हारा, विजय जैन यांच्यासह राजू बाविस्कर या तीन चित्रकारांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय पारितोषिक मिळणे ही खानदेशातील ऐतिहासिक गोष्ट आहे.

विकास मल्हारा आणि राजू बाविस्कर यांना पेंटिंगसाठी तर विजय जैन यांना ड्रॉईंगसाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रोख पंधरा हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार समारंभ ऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्रॉफ्ट सोसायटीच्या दिल्ली येथील कार्यालय आवारात दि. ३१ मार्च २०२२ रोजी पार पडला.

जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, डॉ. करण सिंग यांच्याहस्ते पुरस्कार देऊन तिघंही चित्रकारांना गौरविण्यात आले. राज्यभरातून चित्रकला क्षेत्रातील मान्यवरांनी जळगावच्या या कलावंतांचे कौतुक केले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या चित्रकारांचे कौतुक करताना “एकाच वेळी तीन जणांना हा बहुमान मिळणे ही खूप आनंदाची, अभिमानाची आणि समाधानाची बाब असून चित्रकलेसाठी काम करणाऱ्या तरूण उमेदवारांसाठी ही प्रोत्साहित करणारी घटना आहे!” अशा शब्दात आनंद व्यक्त केला आहे.

तिघे चित्रकार या राष्ट्रीय संस्थेच्या भविष्यातील कॅम्प किंवा वर्कशॉपसाठी पात्र ठरले आहेत. या तिघंही चित्रकारांचा अनेक वर्ष चित्र अभ्यास सुरू असून प्रत्येकाची स्वतंत्र चित्रनिर्मितीची भाषा आहे. याआधीही या चित्रकारांचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक ठिकाणी प्रदर्शने झाली आहेत. अनेकविध ठिकाणचे राज्य राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कारही या चित्रकारांना मिळाले आहेत. राष्ट्रीय आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात पेंटिंग, शिल्प, ड्रॉइंग आणि ग्राफिक या चार प्रकारांमध्ये हजारो कलाकृती मधून २४० कलाकृतींची निवड झाली होती. त्यातून ३० कलाकृतींना पारितोषिके देण्यात आली आहेत.

भारत सरकारच्या संलग्न असलेल्या ऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी असून १९४६ला या सोसायटीचे पहिले चित्रप्रदर्शन झालेले आहे. ९४ वर्षे दीर्घकाळापासून चालू असलेले हे राष्ट्रीय वार्षिक प्रदर्शन कोरोना महामारीमुळे मागील वर्षाचा अपवाद वगळता अखंडित दरवर्षी प्रदर्शित होते. जळगावची कु. ओशिन मल्हारा या तरूण चित्रकर्तीच्या चित्राचीही या प्रदर्शनामध्ये निवड करण्यात आली आहे. ही उल्लेखनिय बाब आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismAll India Art & Craft Societyashokbhau jainMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In