
पर्यटन क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता
महापर्यटन विशेष | पर्यटन म्हणजे एक व्यक्ती किंवा समूहाने अभ्यास, मनोरंजनासाठी किंवा कामासाठी केलेला प्रवास. फुरसतीच्या वेळात अनेक अनुभव घेण्याचे साधन म्हणून पर्यटनाकडे पाहिले जाते. जागतिक पर्यटनाने अनेक चढ – उतार पहिले आहेत. जागतिक मंदी, नुकतीच येऊन गेलेली कोरोनाची लाट यामुळे पर्यटन ठप्प झालेले दिसले. आता निर्बंध कमी होत असल्याने पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पावले वळायला सुरुवात झाली आहे. प्राचीनकाळात पर्यटन म्हणजे विविध धार्मिक स्थळे, नवीन प्रदेशांचा शोध तसेच व्यापारासाठी केलेला प्रवास हा एवढाच उद्देश होता.
भारतीय पर्यटन प्राचीन असून ते धार्मिक स्थळांशी संबंधित आहे. याचे प्रमुख उदाहरण म्हणजे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक स्थळांना भेटी दिल्या. धार्मिक प्रवासासाठी धर्मशाळा उभारण्याची सुरुवातही याच काळात झाली. अर्थशास्त्रामध्ये व्यापाऱ्यांना व्यापारा निमित्ताने पर्यटन करणाऱ्यांना संरक्षण देण्यात येत असल्याची नोंद आहे. ग्रीक साहित्यामध्ये असे नमूद आहे की, भारतामध्ये प्रवाशांसाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे, विहिरी, विश्रामगृहांची व्यवस्था व संरक्षण यांचेही नियोजन होते.
या आहेत संधी – भारतात २०१ ९मध्ये ‘ जीडीपी’त पर्यटनाचा ६.९ टक्के हिस्सा होता. याचवर्षी ४ कोटी रोजगार निर्माण झाले होते. भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. युनेस्को मानांकित ४० भारतीय वारसा स्थळे हे पर्यटकांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करणे हे गरजेचे आहे हे जाणून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी पर्यटन मंत्रालय, भारत सरकारने १९८३ मध्ये इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट नावाची संस्था स्थापन केली. या शिखर संस्थेचा मुख्य उद्देश वैविध्यपूर्ण अशा पर्यटन व्यवसायाशी निगडीत तत्पर, कार्यक्षम व निष्णांत मनुष्यबळ निर्माण करणे हा आहे. या संस्थेची ग्वाल्लेर, गोवा, भुवनेश्वर, नोएडा, नेल्लोर, शिलाँग येथे केंद्रे आहेत. या ठिकाणी पर्यटनाशी निगडित अनेक अभ्यासक्रम राबविले जातात. तसेच पर्यटनाला आवश्यक अशा विविध विषयांवर संशोधनही केले जाते.
पर्यटन व कार्गो, लॉजिस्टिक, योगा व स्वास्थ, ट्रॅव्हल फोटोग्राफी इ. पर्यटनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या टूर गाईड व आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी ही या संस्थेवर आहे. महाराष्ट्र शासनामध्ये उच्च व तंत्र निकेतन या विभागाद्वारे पर्यटन व्यस्थापनाला लागणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तीन वर्षांचा डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम हा अभ्यासक्रम राबविला जातो. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजीची केंद्र पुणे, नागपूर आणि ठाणे येथे आहेत.
भारत सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असून येथे येणाऱ्या व देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटनामागे अनेक हेतू आहेत . साहसी पर्यटन , वारसा पर्यटन , व्यवसाय पर्यटन , मेडिकल पर्यटन इ . अनेक कारणासाठी पर्यटन केले जाते . यासाठी पर्यटन क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे , हे सिद्ध होते म्हणूनच या क्षेत्रातील करिअर उपयुक्त ठरू शकते.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन