Thursday, June 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
५ कोटींचा व्यवसाय करणारे कोंकणातील छोटेसे गाव – Video

संपूर्ण कोकणात नेटवर्क कनेक्टीव्हीटी, पाणी पुरवठा, कचरा निर्मूलनासह पायाभूत सुविधा मिळणार

ऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीच्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात खानदेशातील तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

५ कोटींचा व्यवसाय करणारे कोंकणातील छोटेसे गाव – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 3, 2022
428 4
0
594
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पर्यटक, पर्यावरण प्रेमी आणि शेतकऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की बघाच

गव्हे – दापोलीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले अकराशे लोकवस्तीचे निसर्गरम्य गाव

Gandhi Teerth – Jain Hills

येथे असलेल्या अनेक लहान/मोठ्या नर्सरीज् मुळे हे गाव नर्सरी व्हिलेज म्हणून प्रसिद्ध आहे.

गव्हे – दापोलीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले अकराशे लोकवस्तीचे निसर्गरम्य गाव. या गावाचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत म्हणजे नर्सरी व्यवसाय. येथे असलेल्या अनेक लहान/मोठ्या नर्सरीज् मुळे हे गाव नर्सरी व्हिलेज म्हणून प्रसिद्ध आहे.

अशी झाली सुरुवात – सौ. शैला आणि श्री.अरविंद अमृते यांनी १९७४ साली गव्हे गावात पहिली नर्सरी सुरु केली. त्यानंतर गावात डॉ. श्रीधर कोपरकर यांची ही निर्सरी सुरु झाली. येथील नैसर्गिक हवामान या व्यवसायासाठी पोषक असल्याने चांगल्या प्रकारची झाडे येथे मिळू लागली. सरकार दरबारी त्याकाळी झाडांना चांगलीच मागणी होती. येथे तयार होणारी उच्च प्रतीची कलमे योग्य दरात खरेदी करण्यात येत असल्याने अनेक गावकरी ही या व्यवसायाकडे वळले. गव्हे गावात तेंव्हापासून आजतायागत अंदाजे ७५ नर्सरीज सुरु झाल्या.

रोजगार निर्मिती आणि स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी या गावातील तरुणांनी नर्सरी व्यवसायात उडी घेतली आहे. छोटी रोपे, ग्राफ्टिंग करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. त्यामुळे या गावात इतर कोठेही न मिळणारी विविध प्रकारची रोपे तयार केली जातात . गावकर्यांनी विशेष प्रशिक्षण घेत विविध झाडांची कलमे बांधण्याची कला अवगत केली असल्याने येथील युवक गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे ते ग्राफ्टिंग करण्यासाठी जातात. त्यामुळे रोजगार निर्मिती होऊन स्वावलंबनाच्या वाटेवर वाटचाल करत असलेले प्रगतिशील गाव म्हणून गव्हे गावाची ओळख निर्माण झाली आहे.

कृषिप्रधान असलेल्या या गावाच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत म्हणजे नर्सरी व्यवसाय. इथे साधारणपणे दीड हजार प्रजातींच्या वेगवेगळ्या प्रकारची झाडे/वेली/वनस्पती आहेत. फ्रुट प्लांट्स, फ्लॉवर प्लांट्स, ऑर्नामेंटल प्लांट्स, फॉरेस्ट प्लांट्स, मेडिसिनल प्लांट्स, स्पायसेस प्लांट्सच्या अगणित प्रजाती येथे बघायला मिळतात. इको सिस्टीमचा समतोल राखण्यासाठी या गावात प्रामुख्याने देशी झाडांची कलमे तयार केली जातात. मागणीनुसार बोटावर मोजण्याइतकी विदेशी झाडे उपलब्ध करून दिली जातात. अनेक प्रकारच्या दुर्मिळ झाडे आणि औषधी वनस्पती, मसाला पिके बघण्यासाठी देश-विदेशातून असंख्य पर्यटक आणि पर्यावरणप्रेमी येथे येत असतात.

कोपरकर्स (कोप्स) नर्सरी – डॉ. श्रीधर आणि सौ. सुहासिनी कोपरकर यांनी कोपरकर्स नर्सरी 1978 साली सुरू केली. कॉप्स या नावाने ओळखली जाणारी ही नर्सरी 15 एकर परिसरात व्यापलेली आहे. डॉ. श्रीधर कोपरकर हे कोप्स नर्सरीचे संस्थापक आहेत. पेशाने क्लिनिकल डॉक्टर आहेत पण ते आता पूर्णवेळ नर्सरी व्यवसाय बघतात.

कोप्स नर्सरीमध्ये फळ रोपांच्या मोठ्या श्रेणीसाठी ओळखल्या जाणार्‍या क्षेत्रामध्ये आंबा, काजू, चिक्कू, कोकम कलम आणि नारळ तसेच सुपारी रोपांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहेत.

अनेक प्रकारच्या औषधी आणि दुर्मिळ वनस्पती –
इंडिजिनस आणि औषधी वनस्पती ही कॉप्स नर्सरीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.  पश्चिम घाटातील (भारत) जवळपास सर्व उपलब्ध औषधी वनस्पती उपलब्ध आहेत.  सामान्य वनस्पतींच्या औषधी मूल्याची लोकांना जाणीव करून देण्यासाठी हा विभाग सुरू करण्यात आला. हळदीचे प्रकार, कोरफड, पायपर लॉगम, शतावरी इत्यादि औषधी वनस्पती कमीत कमी देखभालीसह वाढू शकते.  दालचिनी, तमालपत्र, जायफळसह सर्व मसाले येथे उपलब्ध आहेत.

आपल्या आवडत्या फळांची मस्त वाईन बनवा घरच्या घरी… ते ही झिरो बजेट मध्ये….

वॉटर प्लांटस Water Plants – कमळाचे असंख्य प्रकार आणि वॉटर लिली ही कोप्स नर्सरीची खासियत आहे. फुलांची झुडुपे, घरातील झाडे, ग्राउंड कव्हर्स, पाम्स, एज अँड हेज प्लांट्स आणि मसाल्याच्या वनस्पतींचे अनेक प्रकार येथे मिळतात.

सुवासिक फुलांची झाडे – सुवासिक फुले निर्माण करणारी झाडे आणि वेली आपला गोड वास संपूर्ण जागेत पसरवतात.  यामध्ये बकुळ, सुरंगी, कैलासपती, हिरवा चाफा, सोनचाफा, मॅग्नोलिया, नाग चंपा, चमेली, ब्राइडल क्रिपर आणि पासीफ्लोरा प्रकारांचा समावेश आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन

Tags: agro tourismashish amruteDr koperkarGavhe DapoliIndia TourismKoperkarKrushi paryatanMahaparyatan.commaharashtra tourismMumbai KonkanNursery Village GavhePlant Nursery
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प !
Maha Tourism News

जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प !

June 11, 2025
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ
Maha Tourism News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ

June 10, 2025
संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत
परंपरा / सण / उत्सव

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

June 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In