Sunday, May 18, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारचा पुढाकार

कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी... पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

संपूर्ण कोकणात नेटवर्क कनेक्टीव्हीटी, पाणी पुरवठा, कचरा निर्मूलनासह पायाभूत सुविधा मिळणार

महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारचा पुढाकार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 30, 2022
403 4
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार… पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

रत्नागिरी : शासनाने महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले असून, या शासनाच्या माध्यमातून कोकणाचा शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार अशी ग्वाही पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे परिवहन संसदीय कार्य मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पर्यटन, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा रायगडच्या  पालकमंत्री  कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम, आमदार राजन साळवी, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार संजय कदम, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ममता मोरे, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

दापोलीत होणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणचा  समारंभ जणू एखाद्या सणासारखा साजरा होत असताना पाहून आनंद व्यक्त करून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड किल्ल्यासाठी 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

त्यानंतर कोकणातील सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका महा विकास आघाडी सरकारने घेतली आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली असून, समितीच्या माध्यमातून किल्ले संवर्धनाचे काम केले जात आहे. किल्ले संवर्धनासाठी वेळप्रसंगी दिल्लीकडे पाठपुरावा करावा लागेल तो सुद्धा करू, परंतु कोणत्याही परिस्थितीत किल्ले संवर्धनाचे काम थांबणार नाही. कोकणातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोकणात रोजगार निर्मिती कशी होईल यादृष्टीने पाठपुरावा केला जात आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे बांधकाम स्थानिक माती व स्थानिक जांभा या दगडाने केले असल्याने त्याचे स्वरूप आणि महत्त्व वाढले आहे. पुतळ्याचे बांधकाम राजांना शोभेल असे करण्यात आले आहे. असे सांगून त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे कौतुकही केले.

ॲड.अनिल परब म्हणाले की, शासनाने कोकणासाठी कधीच निधी कमी पडू दिला नाही.  कोकणाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केला.

कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, छत्रपती शिवरायांच्या विचारांना साजेशे काम या शासनामार्फत होत आहे. कोकणातील गड- किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम प्रगतीपथावर चालू आहे.

पंधरा ते वीस गड-किल्ल्यांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोकणातील स्थानिक जनतेला न्याय देण्यासाठी कोकण विभागातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा यावेळी कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismForts of maharshtraIndia TourismMahaparyatan.commaharashtra tourismRaigadपर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Maha Tourism News

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

May 17, 2025
यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना  उत्साहात
Maha Tourism News

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

May 16, 2025
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
Maha Tourism News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 16, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In