
पर्यटन क्षेत्रातील आदरतिथ्यचे प्रशिक्षण सर्वांनी घेणे आवश्यक… श्री हनुमंत हेडे – पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक
अतिथी देवो भव या संकल्पनेला रुजू करण्यासाठीं गाईड ट्रेनिंग ही महत्त्वाची बाब – सचिव सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसाय संघ
एमटीडीसी ओरस , सिंधुदुर्ग येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण (Tourist Guide Traning Program) कार्यक्रमाचे मा. ॲड. नकुल परसेकर सचिव सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसाय संघ यांचे हस्ते दीप प्रज्वलन
पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उददेशाने पर्यटन विभाग , महाराष्ट्र शासनच्या पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबईच्यावतीने दिनांक 21 मार्च 2022 ते 25 मार्च 2022 या 5 दिवसाच्या प्रशिक्षण सिंधुदुर्ग ओरस येथील कॉन्फरन्स हॉल, एमटीडीसी ओरस या ठिकाणी गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन मा.ॲड. नकुल परसेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जितेंद्र पंडीत अध्यक्ष सावंतवाडी तालुका पर्यटन महासंघ , श्री विजय गोंदवले सदस्य पर्यटन पर्यटन महासंघ सिंधुदुर्ग, पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे, आय आय टी टी एम ग्वाल्हेर चे डॉ. रामकृष्ण कोगाला, आणि श्री दीपक माने प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी रत्नागिरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. ॲड. नकुल परसेकर म्हणाले की ” सिंधुदुर्ग नगरीला निसर्ग संपदा लाभली असुन या अतिथी देवो भव या संकल्पनेला रुजू करण्यासाठीं गाईड ट्रेनिंग देणे ही महत्त्वाची बाब आहे. आदरतिथ्य हा पर्यटनचां मूळगाभा असुन ही एक सामूहिक जबाबदारी आहे मग तो रिक्षचालका, टॅक्सी चालक, होटेल , गाईड या सर्वांनी पर्यटनातील आदरतिथ्यचे प्रशिक्षण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे देण्यात येणारे गाईड ट्रेनिंग ही एक चांगली संधी असुन याचा सुयोग्य वापर प्रशिक्षणार्थ्यांनी करावे आणि एक उत्कृष्ट गाईड तयार व्हावे असे आवाहन करून प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात श्री हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग नवी मुंबई म्हणाले की स्थानिक युवकांना पर्यटक गाईड प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे त्याच प्रमाणे गाईड हा पर्यटन स्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मन लावून हे प्रशिक्षण घ्यावे आणि आलेल्या संधीचा उपयोग करून घेण्याचे आव्हान श्री हनुमंत हेडे उपसंचालक कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळख पत्र ही देण्यात येणार आहे असे श्री हनुमंत हेडे उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई यांनी सांगितले.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन
