Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
डोंगरावरचा गणपती….. स्वयंभू श्री अष्टवणे गणपतीचे स्थान

श्री क्षेत्र परशुराम

विठ्ठल रुख्मिणी मंदिर पंढरपूर, महापूजा थेट प्रक्षेपण - LIVE

डोंगरावरचा गणपती….. स्वयंभू श्री अष्टवणे गणपतीचे स्थान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 8, 2020
541 6
1
752
SHARES
3.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकदा दर्शनासाठी जायलाच हवं असं गणेश मंदिर

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

कसे जायचे

गुहागर…..  दाभोळची खाडी ते जयगडची खाडी असा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेले रत्नागिरी जिल्ह्यातले तालुक्याचं ठिकाण. गुहागर हे गाव पुण्यापासून सुमारे दोनशे नव्वद किलोमीटर आणि मुंबईहून दोनशे पंचाहत्तर किलोमीटरवर आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या अलीकडं परशुराम घाट उतरल्यानंतर उजवीकडे वळून, पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गुहागर गावात आपण पोहोचू शकतो. 

गुहागर समुद्र किनारा

गुहागर ते असगोली असा सात किलोमीटर लांबी लाभलेला समुद्रकिनारा म्हणजे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ, शांत असून इथल्या मऊ वाळूतून चालताना तासंतास कसे निघून जातात ते समजतच नाही. लाल मातीत नागमोडी वळणे घेत जाणारे अरुंद रस्ते, नारळी पोफळीच्या झाडांमध्ये लपलेली कौलारू घरे, प्राचीन देवस्थानं हे गुहागरचं वैशिष्ठ्य. 

श्री देव व्याडेश्वर, श्री दुर्गादेवी, उफराटा गणपती, वारदंबिका / कार्तिक स्वामी मंदिर, कोपरी नारायण मंदिर अशा प्राचीन देवस्थानांमुळे गुहागर गाव देवभूमी म्हणूनही ओळखलं जातं.

गुहागर गावाच्या पूर्वेस असलेल्या उंच डोंगरावर वसलेल्या, मात्र पर्यटकांसाठी थोड्याशा अपरिचित असेल्या, अष्टवणे गणेशाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मुसळधार पावसात आमच्या कॅमेरा टीमने छत्रीचा आधार घेत या निसर्गपूर्ण स्थळाचे चित्रीकरण केलंय ते आपल्या पर्यंत पोहोचवत आहोत. चला तर मग, मुसळधार पावसात, श्री अष्टवणे गणेशाच्या दर्शनाला.

गुहागरच्या वरचा पाट भागात असलेल्या कार्तिक स्वामी मंदिराशेजारून जाणाऱ्या रस्त्याने पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला भातशेतीने वेढलेल्या पटांगणात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचे भव्य शिखर आपले लक्ष वेधून घेते. पाखाडीवरून पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेल्या पायऱ्यांपासून डोंगर चढणीस सुरुवात होते. 

आजूबाजूला दिसणारी खास कोकणी शैलीतील कौलारू घरं, सारवलेल्या अंगणात असलेले तुळशीवृंदावन आपल्या दृष्टीस पडते. दुतर्फा असलेल्या नारळ, सुपारी , आंबा , फणस काजूच्या झाडांमध्ये लपलेली ही वाट, मनाला भुरळ पडावी अशीच आहे. 

पायऱ्या चढून वर जातांना अष्टवणे गणेश मंदिराचे पांढरेशुभ्र शिखर आपले लक्ष वेधून घेते. पंधरा ते वीस मिनिटांच्या चढणीनंतर दाट झाडीत असलेल्या नितांत सुंदर आणि रम्य अशा अष्टवणे गणेश स्थानावर आपण येऊन पोहचतो. स्वच्छ परिसर , निरव शांतता यामुळे चढण चढतांना आलेला थकवा कुठल्याकुठे निघून जातो. डाव्या हाताला अखंड प्रवाहित असलेला झरा गोमुखातून सोडण्यात आल्याचे बघायला मिळते. थोडं पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण मुख्य मंदिरात पोहोचतो. चकचकीत टाईल्स लावून बांधलेले सभागृह आणि पुढे कळसाखाली छोट्याशा दगडी घुमटीतील सुबकशी स्वयंभू गणेश मूर्ती असलेला गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. सभागृहातील भव्य झुंबर, विविध रंगसंगतीत LED दिव्यांची प्रकाश व्यवस्था आपले लक्ष वेधून घेते. 

 शेंदरी रंगातील अंदाजे दोन अडीच फूट उंचीच्या गणेशमूर्तीच्या कपाळावर चंद्रकोर कोरलेली दिसते. मूर्तीच्या पुढ्यात मोदक ग्रहण करणारा पितळी उंदीर आहे. नवसाला पावतो अशी या गणेशाची ख्याती असल्याने अनेक भाविक इथे दर्शनाला येत असतात. जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या अष्टवणे गणेशाचे महत्त्व एवढे आहे की मंदिरात संकष्टी, अंगारकी चतुर्थीला आणि प्रत्येक मंगळवारी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. अभिषेक, पूजाअर्चा आणि देणगीसाठी श्री अष्टवणे गणेश मंदिर संस्थान यांच्याशी संपर्क साधावा.

दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातून आपण पश्चिमेकडे जेव्हा बघतो तेव्हा दूर क्षितिजावर समुद्राच्या लाटांमुळे निर्माण होणाऱ्या चंदेरी रेषा, किनाऱ्यावरील आभाळाला भिडलेली नारळ पोफळीची झाडे, आकाशात उडणारे असंख्य पक्षी, हे मनोहारी दृश्य नजरेसमोरून जातच नाही.  

गुहागर गाव हे तालुक्याचं ठिकाण असल्याने येथे भोजन निवासाची उत्तम सोय होऊ शकते . या परिसरात फिरण्यासारखी अनेक स्थळं आहेत. एका दिवसात आपण श्री देव वेळणेश्‍वर, हेदवी गणपती मंदिर, बामणघळ या ठिकाणांना भेटी देऊन आपण परत गुहागरला मुक्कामी येऊ शकतो.

गुहागर ते असगोली असा सात किलोमीटर लांबी लाभलेला समुद्रकिनारा म्हणजे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ, शांत असून इथल्या मऊ वाळूतून चालताना तासंतास कसे निघून जातात ते समजतच नाही. लाल मातीत नागमोडी वळणे घेत जाणारे अरुंद रस्ते, नारळी पोफळीच्या झाडांमध्ये लपलेली कौलारू घरे, प्राचीन देवस्थानं हे गुहागरचं वैशिष्ठ्य. 

Tags: Ashtavne Ganeshfamous Ganpati from RatnagiriGanpatiPuleMountain Ganeshअष्टविनायकगणपतीपुळेगणपतीबाप्पा मोरयागुहागरगुहागरचा प्रसिद्ध गणपतीडोंगरावरचा गणपतीरत्नागिरीसवयंभू गणपती
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Comments 1

  1. Sameer Sitaram Khandekar says:
    6 years ago

    सुंदर छायाचित्रण आणि माहीती.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In