राजा शिवछत्रपतींचे प्रेरणास्थान – भगवान परशुराम

ज्ञान, भक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूंचा सहावा अवतार भगवान् परशुराम तपःसाधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम म्हणजे भगवान् परशुराम आपल्या युगातील अत्याचारी आणि समाजविघातक शक्तींचा नाश करून समाजाला सुखाचा मार्ग दाखविणारे चिरंजीव भगवान परशुराम हजारो वर्षांपूर्वी अपरांतभूमीची निर्मिती करणारे आणि राजा शिवछत्रपतींचे प्रेरणास्थान असलेले (संदर्भ-मानंद) असे भगवान परशुराम !
अशा भगवान् परशुरामांचे मूर्तरूपात दर्शन घडावे आणि ते तरूण पिढीसाठीही ● प्रेरणादायी ठरावे या हेतूने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक सौ. अश्विनी आणि श्री. अनिल गोविंद गानू यानी ‘परशुराम भूमी’ या प्रांगणाची निर्मिती केली आहे. ४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर २१ फूट उंची असलेली परशुरामांची ही भव्य मूर्ती उभी केलेली आहे. फेरोक्रीट पद्धतीने हा पृथ्वीचा अर्धगोल बांधला आहे.
दि. 16 नोव्हेंबर, २०१० रोजी स्थानापन्न करण्यात आलेले भगवान् परशुरामांचे हे भव्य शिल्प उत्तराभिमुख असून ‘तामसतीर्थ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे दर्शन येथून होते. समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात.
सोलापूरचे मूर्तिकार श्री ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी हे भव्य शिल्प फायबरमध्ये वर्षभर मेहनतीने केलेले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. अनिल गोविंद गानू – Mob – 9822022294 , सौ. अश्विनी अनिल गानू – Mob – 9422007125
प्रवर्तक : श्री. राजेंद्र चं. मनोहर – Mob – 9822001494, श्री. अतुल मो. केतकर – Mob – 9819163606
