जळगावातील वैशीष्ट्यपूर्ण सोंग

ह.भ.प मंगेश महाराज जोशी – श्रीराम मंदिर संस्थान यांनी दिलेली माहिती
नवस फेडण्यासाठी पुरुष मंडळी वाजत गाजत स्त्री रुपी देवीचे सोंगे घेऊन मुकूट, लांब केस, भरजरी वस्त्रे, देवीच्या हातात विविध अस्त्रे, त्रिशूळ घेऊन नाचतानाचे अनोखे चित्र यावेळी जळगाव शहरात दिसत आहे ,
खान्देशातील थोर संत अप्पा महाराज यांनी सन १८७२ मध्ये हिंदू समाजातील १८ पगड जाती, एकत्र करून प्रभू श्रीरामांच्या रथोत्सवास प्रारंभ केला. आज त्याला 149 वर्षे झाली. असंख्य भाविकांच्या सहकार्याने हा रथोत्सवाचा नंदादीप अखंड तेवत आहे. तेव्हा पासून कार्तिकी एकद्शी निमित्ताने जळगावच्या श्रीराम संस्थान तर्फे रथ उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या रथोत्सवाचे एक वैशिठ्य म्हणजे या काळात अनेक भाविक आपले नवस बोलत असत्तात आणि हे नवस पूर्ण करण्या साठी आणि फेडण्या साठी पूरूष स्त्री रुपी देवीचे सोंग घेऊन नाचतात.
या रथ दर्श्नानाने आपल्या मनोकामना पूर्ण होत असल्याने श्रद्धेने मोठ्या प्रमाणावर भाविक या रथ दर्शनाचा लाभ घेत असत्तात. या रथोत्सवाचे एक वैशिठ्य म्हणजे या काळात अनेक भाविक आपले नवस बोलत असत्तात आणि हे नवस पूर्ण करण्यासाठी आणि फेडण्या साठी पूरूषांनी देवीचे सोंग घेऊन नाचण्याची अनेक वर्षान ची परंपरा आहे आणि आज देखील ती कायम आहे.
अनेक भाविक आपला नवस फेडण्या साठी वाजत गाजत देवीचे सोंगे घेऊन मुकूट ,लांब केस .भरजरी वस्त्रे.हातात देवीची अस्त्रे त्रिशूळ घेऊन नाचतानाचे अनोखे चित्र यावेळी जळगाव शहरात दिसत आहे ,शहरातील प्रमुख भागातून या रथाची मिरवणूक काढण्यात येत असते , त्या आधी देवीची सोंग नाचतानाचे चित्र आज जळगाव शहरात सर्वत्र दिसत आहे……
