Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

येथे पुरुष घेतात महिषासुरमर्दिनीचे रूप…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा... जलसंपदा मंत्री जयंत पाटील

सामर्थ्यशील भारताच्या निर्माणात योगदान द्यावे… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 9, 2021
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संशोधकांनी दर्जेदार व अधिक पोषणमूल्य असणाऱ्या कृषी उत्पादनांची निर्मिती करण्याचे राज्यपाल तथा कृषि विद्यापीठ कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन…..

Gandhi Tirtha – Jain Hills

अकोला – नव्या व सामर्थ्यशील भारताचे निर्माण करण्यात नव्या कृषी पदवीधर, संशोधकांनी योगदान द्यावे, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण भारताला आता ह्या संशोधकांनी  दर्जेदार व अधिक पोषणमूल्य असणाऱ्या कृषी उत्पादनांची निर्मिती करावी, असे आवाहन राज्यपाल तथा कृषि विद्यापीठ कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ आज संकरीत पद्धतीने (प्रत्यक्ष तथा अभासी ) कृषी विद्यापीठ परिसरातील दीक्षांत सभागृहात पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल, तथा कुलपती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भगत सिंह कोश्यारी हे अभासी पद्धतीने उपस्थित होते, तर कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उप महासंचालक मा. डॉ. आर.सी. अग्रवाल, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू मा. डॉ. आशिष पातुरकर, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू डॉ. अशोक ढवण (अभासी पद्धतीने) यांचे सह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले, विदयापीठ कुलसचिव मा.डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ. एम एल मदन (अभासी पद्धतीने), मा.डॉ.शरदराव निंबाळकर, मा. डॉ. व्यंकटराव मायंदे (अभासी पद्धतीने), विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य तथा आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्मानीय इतर सदस्य मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, माजी कार्यकारी परिषद सदस्य गणेश कंडारकर, विनायक सरनाईक व मा.विद्यापीठ विद्या परिषद सदस्य आदी  मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, १९६० च्या सुमारास आपला देश आयात अन्नधान्यावर अवलंबून होता. आज आपण अन्नधान्य उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण आहोत. याचे श्रेय कृषी संशोधक व शेतकऱ्यांना आहे. देशात हरित क्रांती झाली. नंतर श्वेत क्रांती झाली आता आपले पंतप्रधान नील क्रांती करण्याची धोरणे आखत आहेत. आपल्या देशात अन्नधान्य उत्पादन विपुल होत असले तरी ते पोषणमूल्याने परिपूर्ण असावे यासाठी अधिक संशोधन व्हावे.  आपली कृषी उत्पादने अधिक दर्जेदार असावीत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, नवा व समर्थ भारत घडविण्यासाठी संशोधकांनी, युवक युवतींनी पुढे यावे, सुंदर भारत व सुंदर विदर्भ हेच युवक घडवू शकतात, अशा शब्दात त्यांनी युवा शक्तीवर आपला विश्वास व्यक्त केला. पसायदान व तत्पश्चात राष्ट्रगीत होऊन  कुलपतींच्या अनुमतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

दीक्षांत समारंभात एकूण ३५५९ स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्या, यामध्ये बी.एस्सी (कृषि) २४८९, उद्यान विद्या १८७, वन विद्या २८, कृषि जैव तंत्रज्ञान १११, कृषि व्यवसाय व्यवस्थापन ७०, बी. एस्सी. अन्नशास्त्र ८१,  बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) ८९, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषि) २१८, उद्यान विद्या ३१, वनविद्या ०२, कृषि अभियांत्रिकी ०७, एम. बी. ए (कृषि) १९, पीएच.डी २७ आदीचा समावेश आहे. उपरोक्त १२५८ स्नातकांपैकी दीक्षांत समारंभात २४ आचार्य पदविधारक स्वतः उपस्थित राहून पदवी स्वीकारली व उर्वरित १२३४ स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरीत्या पदवी स्वीकारतील. तर ३१ सुवर्ण, १६ रौप्यपदके, ३३ रोख तर तीन जणांना पुस्तकी स्वरुपात असे एकूण ८३ जणांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. २७ जणांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉपीची पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठांमधील शिक्षण त्याचा संशोधन कार्यामध्ये आपले उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षक तथा संशोधकांना विविध पदके तथा पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत गायन झाले. त्यानंतर सरस्वती वंदना होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी प्रास्ताविकपर भाषण करुन विद्यापीठाचा कार्य अहवाल सादर केला. त्यानंतर प्रति कुलपती दादाजी भुसे तथा इतर मान्यवरांचे हस्ते पदवीदान व पारितोषिक वितरण पार पडले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे  उप महासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करतांना विद्यापीठाच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल कौतूक केले. विद्यार्थ्यांचे तसेच नव संशोधकांचेही त्यांनी कौतुक केले. आपले संशोधन हे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे व सुलभ असावे. तसेच संशोधनाच्या क्षेत्रात आपल्या विद्यापीठांचे बहुमोल योगदान असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्योती हातेकर यांनी केले कार्यक्रमात  इंद्रधनुष्य मेलोडी ग्रुपच्या कलावंतांनी विद्यापीठ गीत, सरस्वती वंदना व पसायदान सादर केले.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In