Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

देशात कोल्हापूर जिल्हा पर्यटनात नंबर एकचा जिल्हा होईल... ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय, पालकमंत्री धनंजय मुंडे

किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरुप असा विकास !

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 13, 2021
401 4
0
557
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही… उपमुख्यमंत्री अजित पवार

Gandhi Tirtha – Jain Hills

पुणे : किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरुप असा विकास करण्यात येईल आणि विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सिंहगड येथे ‘माझा सिंहगड, माझा अभिमान’ कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख  उपवनसंरक्षक  राहूल पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पर्यटकांना सिंहगडाच्या इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा हा दृष्टीकोन समोर ठेवून विकास करण्यात येईल. गडावर येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी व हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून वन विभागाच्या माध्यमातून  प्रशिक्षण देण्यात येईल.

राज्यासह पुणे महानगरातून सिंहगडावर येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गडालगत वाहनांची गर्दी होते. गडाच्या पायथ्यापासून गडावर येण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस सुविधा सुरु करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही गडावर येता यावे यासाठी रोप वे निर्मिताचा विचार सुरू आहे. सिंहगड किल्ल्यावरील विनापरवाना अतिक्रमण काढण्यात येईल. गडाच्या परिसरातील स्थानिकांना प्राधान्य देवून स्टॉल देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ

वन विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा तसेच गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ श्री.पवार यांच्या उपस्थितीत झाला. “माझा सिंहगड माझा अभियान” अंतर्गत पुणे वन विभागामार्फत विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सेल्फी पॉईंट, गाईड ट्रेनिंग, प्लास्टिक बंदी, वन विभाग व पीएमपीएलच्या माध्यमातून ई व्हेइकल सुरु करण्यात येणार आहे. याबाबत श्री पवार यांनी समाधान व्यक्त केले.

श्री  पवार यांनी  प्रस्तावित फूड स्टॉलची जागा, हवा पॉइंट, विश्रामगृह,वन विश्रामगृह येथे भेट देवून पाहणी केली. उपवनसंरक्षक श्री. पाटील यांनी ‘माझा सिंहगड, माझा अभिमान’ कार्यक्रमाबाबत माहिती दिली

Tags: India Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In