Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरुप असा विकास !

कोकण विभागात पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाचे विविध प्रयत्न.... विभागीय उपायुक्त मनोज रानडे

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय, पालकमंत्री धनंजय मुंडे

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 13, 2021
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीड : भारतीय स्वातंत्र लढयाचा इतिहास उपलब्ध आहे त्याच धर्तीवर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

Gandhi Tirtha – Jain Hills

माजलगांव येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उदघाटन पालकमंत्री श्री मुंडे यांच्या हस्त झाले. याप्रसंगी ते बोलत होते. उदघाटन समारंभास आमदार प्रकाश दादा सोळंके, आमदार संदीप शिरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जि.प.बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, जि.प.सभापती कल्याण आबुज, माजलगाव पंचायत समिती सभापती सोनाली नवले,  गटविकास अधिकारी एस जी हजारे, श्री अशोक डक, नगराध्यक्ष शेख मन्सूरचॉद साहेब, श्री राधाकृष्ण होके पाटील, श्री बाबूराव पोटभरे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, सध्या आपण कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात आहोत तरीदेखील सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेत राज्य सरकारने निधी कमी पडू दिला नाही.  यातूनच आपत्तीच्या काळात देखील माजलगाव मध्ये विकासाची अनेक काम देखील झाली आहेत. असे मंत्री श्री मुंडे म्हणाले.

आमदार प्रकाश सोळंके यांचे विकासात महत्त्वाचे योगदान

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वर्गीय सुंदरराव सोळंके यांचा स्मृतिदिन आहे या महत्वाच्या दिवशी हा लोकार्पण सोहळा झाला.यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांचे विकासात महत्त्वाचे योगदान आहे. आमदार सोळंके यांची सुरुवात पंचायत समिती सदस्य पदापासून सुरू झाली त्यानंतर ते राज्यात राज्यमंत्री देखील झाले त्यांचा अनुभव आणि विकास कामांची सुरुवात पंचायत समिती मधूनच झाली. ते सतत विकासासाठी पाठपुरावा करून विकास घडवत आहेत. येथे नगर परिषदेचे सिमेंट रस्ते कोरोना काळात झाले. माजलगाव येथे नाट्यग्रहासाठी 5 कोटी रु. निधीची मंजूरी आणि माजलगाव एम.आय.डी. सी सह   विकासाची अनेक काम होत आहेत.

मंत्री महोदय म्हणाले, माजलगाव हा सधन तालुका आहे. यासाठी माजलगाव धरण महत्त्वाचे ठरले असून या धरणास सुंदर सागर असे नामकरण करून येथे चांगले उद्यान विकसित करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल.बीड जिल्हयातील नवीन जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत आणि सर्व नवीन पंचायत समिती इमारतींमध्ये साधनसामग्री फर्निचर यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी आश्वासित केले.

ते म्हणाले,आता सर्वात जास्त ऊस उत्पादन बीड जिल्हा जिल्ह्यात होते तेव्हा येथील सर्वात जास्त मजूर ऊस तोडणी साठी इतर जिल्हयात जातो. बीड जिल्ह्यास हक्काचे पाणी मिळवून देऊ यातून येथील दुष्काळ पुसून टाकण्यास मदत होईल असे मंत्री श्री मुंडे यांनी सांगितले.

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, तालुक्यातील गोरगरीब सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून घडत असते. सामान्य माणसाला येथे आल्यानंतर विश्वास वाटला पाहिजे. या पंचायत समितीच्या नवीन इमारती मधून विश्वासाने सामान्य माण्साचे काम व्हावे. तसेच योजनांचे उदिदष्ट 100% साध्य करण्याचे काम व्हावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे पा्रस्ताविक पं.स.सभापती सोनाली खुळे यांनी केले.  तसेच सभापती जयसिंग सोळंके आणि विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि मंत्री महोदयांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन व फित कापून नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीच्या विविध योजनातील लाभार्थ्यांना पालकमंत्री श्री मुंउे यांच्या हसत धनादेशाचे वितरण करण्यात आले. यामध्ये सुनील राठोड व मनीषा राठोड या दांमपत्यास आणि प्रशांत थिटे यांचा सत्कार करण्यात आला.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In