मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल जागतिक पर्यटन दिन २०२१ सोहळा पार पडला. या सोहळ्यात विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला;

• मुंबई हायकोर्ट व मुंबई विद्यापीठात या शहराच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. येथे हेरिटेज वॉक सुरू करण्यासंदर्भात सामंजस्य करार झाला
• महाराष्ट्र पर्यटनाचे संकेतस्थळ व मोबाइल अॅपचे अनावरण करण्यात आले
• कोकण विभागीय पर्यटन कार्यालयाचे उद्घाटन व सहा विभागीय ठिकाणांच्या टुरिझम वॉलचे आभासी प्रदर्शन यावेळी करण्यात आले
• महाराष्ट्र टूर गाईड्स व प्रशिक्षणार्थींना तसेच महाराष्ट्राचे मास्टर शेफ व जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला
कोविड काळात पर्यटन विभागाने स्वस्थ बसून न राहता क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण व अभिमानास्पद कार्य केलं आहे. येत्या काही वर्षात कोविडमुक्त जगात याच प्रयत्नांमुळे महाराष्ट्र जगाच्या पर्यटन नकाशावर अग्रस्थानी झळकेल हा विश्वास आहे.
यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर जी, पर्यटन विभागाचे संचालक धनंजय साळगावकर जी, पर्यटन संचनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर जी, विभागीय मंडळाच्या संचालक जयश्री भोज जी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर जी आदी मान्यवर उपस्थित होते.

