Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणीक पर्यटन

अनुभूती बालनिकेतनच्या समर कॅम्पची उद्यापासून सुरवात

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणीक पर्यटन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 2, 2026
395 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्रो सहल यशस्वीपणे पूर्ण | आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अनुभव

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजित इस्रो (ISRO) सहल यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध प्रकल्पांची माहिती मिळाली, उपग्रह निर्मितीची प्रक्रिया समजली आणि अंतराळ संशोधनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरला.

या सहली करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमातून निधी प्राप्त करुन देण्यात आला होता. या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले. तसेच, मंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मा मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या सहलीत एकूण 18 विद्यार्थी आणि 6 शिक्षक-कर्मचारी सहभागी झाले होते. या सहलीत विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट दिली. तसेच, सायन्स सिटीमध्ये एक्वेरियम, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक विभागांचा अभ्यास केला. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होता.विद्यार्थ्यांनी रेल्वेने प्रवास करत सहलीला सुरुवात केली होती, तर परतीचा प्रवास विमानाने करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

या सहलीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवणे, संशोधनाची आवड निर्माण करणे आणि भविष्यातील अंतराळ क्षेत्रातील संधींची माहिती देणे हा होता. विद्यार्थ्यांनी सहलीच्या अनुभवातून आपली वैज्ञानिक जिज्ञासा अधिक प्रगल्भ केल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यार्थ्यांनी व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी या सहलीबाबत आपले सकारात्मक अभिप्राय व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. काही विद्यार्थ्यांनी भविष्यात वैज्ञानिक किंवा अंतराळ संशोधक बनण्याची इच्छा व्यक्त केली. शिक्षकांनी अशा सहलींमुळे विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याचा अनुभव मिळतो आणि त्यांची जिज्ञासा वाढते, असे सांगितले.

या सहलीचे यशस्वी आयोजन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील, आर. एम. लावणे, संदीप पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एल. एम. पाटील, एम. आर. सुलताणे, व्हि. डी. गायकवाड व एम. डी. पाईकराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In