Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे ईको ग्लॅम्पिंग महोत्सव

पानिपत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राज्य शासनातर्फे उभारला जाणार

राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे ईको ग्लॅम्पिंग महोत्सव

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 26, 2025
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पॅरा सेलिंग, पॅरा मोटरिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, डुओ सायकलिंग, ऑल-टेरेन व्हेईकल्स (एटीव्ही) आणि पेंटबॉल अरेना यासारख्या रोमांचक ॲक्टीव्हिटीजचा समावेश

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

नाशिक, दि.25 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  जिल्ह्यात पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत नाशिक येथे गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे आयोजित ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झाले.

यावेळी  पर्यटन संचालनालय, मुंबई चे संचालक बी. एन. पाटील, पर्यटन  संचालनालय, नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, नाशिक परिसरातील पर्यटन स्टेकहोल्डर, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ नाशिक चे अध्यक्ष व सदस्य, भोसला मिलिटरी स्कूल चे विद्यार्थी व पर्यटन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व पर्यटक उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी येथे उभारण्यात आलेल्या टेंटची व स्टॉलची पाहणी केली.

गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे २५ जानेवारी २०२५ ते ३१  मार्च २०२५ पर्यंत इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. जेथे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी लक्झरी कॅम्पिंग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहसी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवामध्ये एकूण ६० टेंट उभारण्यात आले आहेत. तसेच विविध वस्तू विक्रीसाठी बचत गट इत्यादी यांना छोटे २० स्टॉल्स टेंट  उपलब्ध करून दिले आहेत. सदर महोत्सवामध्ये उभारलेले टेंट पर्यटकांना भाड्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पर्यटकांसाठी  विविध प्रकारचे मनोरंजनात्मक व साहसी उपक्रम आयोजित केले आहेत. या उपक्रमांमध्ये Wine Experience Center, हस्तकला व खाद्य पदार्थ प्रदर्शन व विक्री, ग्रामीण जीवन शैली चे अनुभव, जमीन, हवा आणि पाणी या संबंधित साहसी उपक्रम, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचा समावेश आहे.

साहसी पर्यटन उपक्रमांमध्ये महोत्सवात पॅरा सेलिंग, पॅरा मोटरिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, डुओ सायकलिंग, ऑल-टेरेन व्हेईकल्स (एटीव्ही) आणि पेंटबॉल अरेना यासारख्या रोमांचक ॲक्टीव्हिटीजचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि फोटोग्राफी, निसर्गोपचार, बायोडायनामिक शेती, आदिवासी कला आणि संस्कृती आणि इको-मरीन एक्सप्लोरेशनवरील कार्यशाळा यांचा देखील अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.

पर्यटकांनी नाशिक मधील लक्झरी कॅम्पिंग व विविध साहसी क्रिडा प्रकारांचा सांस्कृतिक उपक्रमांसमवेत अनुभव घेणेसाठी नक्की या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.

Tags: agro tourismDirectorates of Tourism MaharashtraDOTIndia Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMtdc resortsNashik tourismnasik
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In