
लोणावळ्यात वन्यजीव आणि जैवविविधतेच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रेक्षणीय स्थळे बंद, पर्यटकांचा होतोय हिरमोड
पर्यटकांचे लोणावळ्यातील सर्वात प्रेक्षणीय आवडते पर्यटनस्थळ असलेले टायगर व लाइन्स पॉइंट्स हे वन्यजीव आणि जैवविविधतेच्या सुरक्षेच्या कारणास्तव ३१ डिसेंबर व १ जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
यंदा नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवार, रविवार वीकेंड आणि त्यानंतर मधला सोमवारचा दिवस वगळता मंगळवारी थर्टी फर्स्ट (३१ डिसेंबर) असा लाँग वीकेंड असल्याने या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने येथे येण्यास बंदी घातल्याचे कळवण्यात आले आहे.

