Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार

पुणे – कोल्हापूर, पुणे – हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ

आग्रा येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी कायमस्वरुपी परवानगीसाठी केंद्रापुढे प्रस्ताव

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 17, 2024
396 4
0
550
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सफरचंद, केशर आणि काळेजिरे या पिकांच्या संशोधन व उत्पादनवाढीसंबंधी जैन इरिगेशनद्वारे मार्गदर्शनाची अपेक्षा…. कुलगुरू प्रा.नझीर अहमदगनाई

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर-ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे.

जळगावच्या जैन हिल्सवर १० सप्टेंबर रोजी झालेल्या या करारावर कंपनीतर्फे सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी तर विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा. नझीर अहमदगनाई यांनी सह्या केल्या आहेत.

आधुनिक पद्धती व तंत्र वापरून विविध पिकांचे उत्कृष्टरितीने उत्पादन कसे घ्यायचे, जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या समस्यांचा प्रभावीपणे सामना कसा करायचा आणि आवश्यक तेवढीच संसाधने वापरून उत्पादन व उत्पादकता कशी वाढवायचीयासंबंधीचे मार्गदर्शन करण्याबरोबरच जैन कंपनीने जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना ऊतीसंवर्धन (टिश्यूकल्चर) व जैव तंत्रज्ञानाचा (बायोटेक्नॉलॉजी) वापर करून तयार केलेलेउत्कृष्ट प्रतीचे, उच्च दर्ज्याचे, रोगविरहीत व व्हायरसमुक्त लागवडीचे साहित्य पुरवायचेआहे. तसेच शेती क्षेत्रातील शाश्वतता कायम राखण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचे आधुनिकतंत्रज्ञान व त्यासाठी वापरली जाणारी साधने आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना आज भेडसावत असलेल्या समस्यांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जैन कंपनीनेमार्गदर्शन करावयाचे आहे. तसे करारात नमूद केले आहे.

याप्रसंगी बोलताना जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नझीर अहमदगनाई म्हणाले की, “सफरचंद, केशर आणि काळेजिरे या पिकांच्या संशोधन व उत्पादनवाढीसंबंधी जैन इरिगेशनने आम्हांला मार्गदर्शन करावे अशी आमची अपेक्षा आहे.

सफरचंदाची जम्मू-काश्मीरची उत्पादकता हेक्टरी १० टनाची, हिमाचलची ८ ते ९ टनाचीतर पश्चिमात्य देशांची ६७ टनांची आहे. आपली उत्पादकता कमी असल्याने उत्पादन खर्चवाढतो व निर्यातीला मर्यादा येतात. जैन कंपनीशी करार केल्यामुळे जे आधुनिक संशोधन वतंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धती उपलब्ध होणार आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यामुळे निश्चितच उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल, पाणी वापरात बचतहोईल आणि विभागातील अन्नधान्य सुरक्षिततेला त्यामुळे हातभार लागून शेतकऱ्यांचीआर्थिक उन्नती होण्यास मदत होईल.

या सहकार्य करारावरती भाष्य करताना कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री.अजित जैन म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या उन्नती व प्रगतीसाठी होतअसलेल्या या कराराचा आम्हांला अभिमान आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आणिआमचे परमपूज्य पिताजी भवरलाल जैन यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरीब व छोट्याशेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून त्या दिशेने संशोधन व तंत्रज्ञान विकसीत केले. ते आज देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे. सिंचनासाठीलागणाऱ्या उत्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याबरोबरच स्वच्छ, शुद्ध व रोगमुक्त दर्जेदार रोपे-कलमेव लागवडीचे अन्य साहित्य आणि अचूक व परिपूर्ण शेतीसाठी (प्रिसीजन फार्मिंगसाठी)लागणारे तंत्रज्ञान आम्ही कृषी विद्यापीठ व शेतकऱ्यांना पुरविणार आहोत. त्यामुळे त्याप्रांतातील कमीत कमी संसाधनांचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन शाश्वतरितीने वाढूशकेल.

सहकार्य कराराचा एक भाग म्हणून कृषी विद्यापीठातील विद्यार्थी व जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना जळगाव येथे बोलावून प्रशिक्षण देण्यात येईल. विविध विषयांचे ८ ते १५ दिवसांचे कोर्सेस त्यांच्यासाठी चालविण्यात येतील. तसेच जैन इरिगेशनमधीलअनुभवी व तज्ज्ञ लोक जम्मू-काश्मीर विद्यापीठात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना अध्यापनाद्वारेमार्गदर्शन करतील”, असेही श्री. अजित जैन म्हणाले. ठिबक सिंचनावर भाताचे पीकघेण्याचा प्रयोग मागील वीस वर्षांपासून आम्ही जळगाव व अन्य ठिकाणी राबवित आहोत.हा प्रयोग जम्मू-काश्मीरमध्येही राबवावा. त्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू, असेही श्री.जैन यांनी कुलगुरुंना सांगितले.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In