Saturday, October 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

जिल्ह्यातील अमृत कलशांचे वाजत-गाजत मिरवणुक

शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध विकास कामे प्रगतीपथावर

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 24, 2023
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावेत…. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई l रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध विकास कामे सुरू असून यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे. ही कामे विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

श्रीवर्धन मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकास कामांबाबत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टमोड, पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्ज्वला दांडेकर, उपवनसंरक्षक (रोहा) अप्पासाहेब निकत, मुख्याधिकारी (म्हसळा) विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, रायगड पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी.

दिवेआगार येथे कासव संवर्धन प्रकल्प उभारणे, पर्यटन मार्केट सुविधा तयार करणे, तळा महादेव तलाव परिसराची पर्यटनदृष्ट्या सुधारणा करणे, मोरबा येथील गाव तलावाचे सुशोभीकरण करणे, रोहा नगरपरिषद हद्दीतील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, श्रीवर्धन समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुशोभीकरण करणे, रोहा येथील ग्रामपंचायत पाटण – सई हद्दीतील कामे, जोगेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरण, मौजे नागोठाणे येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुरातन निवासस्थान सुशोभीकरण, रोहा नगरपरिषद हद्दीतील हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरण, तळघर येथील तलावाचे संवर्धन करणे अशी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत सन २०२१-२२ मधील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध ४४ कोटी ७९ लाख रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करावेत.

श्रीवर्धन शहरातील पर्यटक निवासी इमारतींचे नूतनीकरण, तलाव कुंडाचे नूतनीकरण,म्हसळा येथील जानसई नदी सुशोभीकरण कामे, श्रीवर्धन येथील मंदिर विकासाची कामे, रोहा नगरपरिषद हद्दीतील शिवसृष्टी परिसर सुशोभीकरण, रोहा येथे शिवसृष्टी शिल्प तयार करणे, तळा येथील कुडा लेणी येथे पर्यटनाच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे, अशी सन 2022 -23 मधील बारा कामे १२ कोटी ५१ लाखांची असून सर्व यंत्रणांनी हे कामे गतीने पूर्ण करावेत, असेही निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRaigad tourismtourist places in raigad
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In