
१ मे रोजी महाराष्ट्र (Maharashtra Day)या सुजलाम सुफलाम राज्याची स्थापना झाली होती. महाराष्ट्र हे राज्य पर्यटनाच्या (Tourism) दृष्टीने खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे सोलापूरचे कीर्तिमान सुपुत्र जागतिक किर्तीचे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी ( Ranjitsing Disale Guruji) व जागतिक किर्तीचे चित्रकार शशिकांत धोत्रे (Painter Shashikant Dhotre) यांचा गौरव होत आहे.
तसे परिपत्रक पर्यटन विभागाने गुरुवारी काढले आहे. यासोबत अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ज्यांनी आपल्या राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल केले आहे त्यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे. त्यात सुप्रसिद्ध इलेक्ट्रिकल इंजिनियर प्रथमेश हिरवे (Electrical Engineer Prathamesh Hirwe), आयएएस अधिकारी प्रांजल पाटील (Pranjal Patil), बॉक्सिंग मेडलिस्ट अल्फिया पठाण (Alphiya Pathan), गिर्यारोहक प्रियंका मोहिते(Priyanka Mohite), लघुपट निर्माते मानसी देवधर(Mansi Deodhar), चैतन्य ताम्हणे (Chaitanya Tamhane), क्रीडापटू कविता राऊत(Kavita Raut), सचिन टेके (Sachin Teke), सुमन धामणे (Suman Dhamane) आदींचाही गौरव करण्याचा निर्णय पर्यटन विभागाने (Maharashtra Tourism Department) घेतला आहे.
