Friday, June 12, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
thumbnail

Padmalaya Ganpati

वांद्रे किल्ला (Bandra Fort) ते माहीम किल्ला (Mahim Fort) बोर्ड वॉक (Board Walk) ठरणार मुंबईतील नवीन आकर्षण

महाराष्ट्र दिनी सोलापूरचे (Solapur) डिसले गुरुजी, चित्रकार धोत्रे यांचा पर्यटन विभागातर्फे गौरव

श्री क्षेत्र पद्मालय गणपती, एरंडोल, जिल्हा जळगाव

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 9, 2021
837 8
0
1.2k
SHARES
5.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Tirtha – Jain Hills

उजव्या आणि डाव्या सोंडेचा असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर

संपूर्ण माहितीसाठी लिंक क्लिक करा

भारतातील अडीच गणेश पिठांपैकी अर्धे पीठ

श्री क्षेत्र पद्मालय हे देवस्थान निसर्गरम्य परिसरात असलेल्या एका सुंदरशा तळ्याकाठी वसलेले आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर विराजमान आहेत. प्रवाळ रत्नापासून बनलेल्या या आकर्षक गणेश मूर्ती अतिशय जागृत असल्याची श्रद्धा असल्याने वर्षभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी या क्षेत्री असते.पद्मालय नावाचं गाव अस्तित्वात नाही मात्र आजूबाजूचा परिसर याच नावानं ओळखला जातो.

जळगाव पासून ३० किलोमीटर आणि एरंडोल पासून १२ किलोमीटर अंतरावर हे स्थान असून एसटी बस अथवा खाजगी वाहनाने या क्षेत्री आपण येऊ शकतो. मध्य रेल्वेच्या भुसावळ/मुंबई रेल्वे मार्गावरील म्हसावद रेल्वे स्थानकापासून आठ किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. जळगावहून म्हसावद मार्गे आल्यास डोंगरमाथ्यावर थोड्याश्या चढणीच्या रस्त्याने पुढे आल्यावर श्री गणेश मंदिराच्या कळसाचे लांबूनच दर्शन घडते. मंदिराच्या अगदी समोरच शेकडो लाल आणि पांढऱ्या कमळांची बहरलेला सुंदर तलाव आहे.  ‘पद्म’ म्‍हणजे कमळ आणि ‘आलय’ म्‍हणजे घर यावरून या स्थानाला पद्मालय हे नाव पडले असावे.  मंदिराच्या दोन दिशाना तळ्यात उतरणाऱ्या पायऱ्या असलेला दगडी घाट बांधलेला दिसतो . 

चोरीला गेलेल्या सोन्याच्या गणपतीची गोष्ट

जळगाव पासून ३० किलोमीटर आणि एरंडोल पासून १२ किलोमीटर अंतरावर हे स्थान असून एसटी बस अथवा खाजगी वाहनाने या क्षेत्री आपण येऊ शकतो. मध्य रेल्वेच्या भुसावळ/मुंबई रेल्वे मार्गावरील म्हसावद रेल्वे स्थानकापासून आठ किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. जळगावहून म्हसावद मार्गे आल्यास डोंगरमाथ्यावर थोड्याश्या चढणीच्या रस्त्याने पुढे आल्यावर श्री गणेश मंदिराच्या कळसाचे लांबूनच दर्शन घडते. मंदिराच्या अगदी समोरच शेकडो लाल आणि पांढऱ्या कमळांची बहरलेला सुंदर तलाव आहे.  ‘पद्म’ म्‍हणजे कमळ आणि ‘आलय’ म्‍हणजे घर यावरून या स्थानाला पद्मालय हे नाव पडले असावे.  मंदिराच्या दोन दिशाना तळ्यात उतरणाऱ्या पायऱ्या असलेला दगडी घाट बांधलेला दिसतो . मंदिरावर ९० फुटी उंच कळस बांधलेला आहे. मुख्य कळसाभवती आठ छोटे उप-कळस असून सोन्याच्या पत्र्याने मढवलेले आहेत. दगडी कळसावर यक्ष, किन्नर आणि वीणा वादन करणाऱ्या नारदमुनीं यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वर दोन भल्या मोठ्या हातींचें शिल्प आहे . संपूर्ण काळ्या पाषाणात बांधकाम असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून अतिशय सुंदर असेच आहे. मंदिर परिसरातील इतर वास्‍तूंचे बांधकामही काळ्या पाषाणातूनच केलेले असल्याचे दिसून येते. मुख्य देवालयाच्या चहूबाजूस गणपतीची छोटीछोटी देवळे आहेत .

श्री दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिर, हेदवी, गुहागर

मंदिराच्या प्रवेशद्वारा बाहेरील परिसरात  पूजासाहित्य, न्याहारी/भोजन व्यवस्था असलेली असंख्य छोटीछोटी दुकाने थाटलेली आहेत. एका भव्य दगडी कमानीखालून आपण मंदिर परिसरात प्रवेश करू शकतो. तलावाकाठी असलेल्या पायवाटेवरून थोडं पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला एक सव्‍वा तीन फूट व्‍यासाचे अवाढव्‍य दगडी जाते दिसून येते. पूर्वीच्‍या काळी धान्‍य दळण्‍यासाठी अशा प्रकारच्‍या लहान जात्‍यांचा वापर घराघरात होत असे. येथे असलेल्‍या जात्‍यास त्याच्या मोठ्या आकारावरून ‘भिमाचे जाते’ म्‍हणून संबोधले जाते. मंदिर जीर्णोद्धाराच्या काळात या जात्यास दोन बैल जुंपून गोल फिरवून धान्याचे बारीक पीठ केले जायचे . त्याकाळी हजारो लोकांसाठी महाप्रसादची व्यवस्था या जात्यातून निघालेल्या पिठापासून तयार केली जायची.  मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे श्री सिद्धेश्वराचे छोटेसे देऊळ आहे . हे देवस्थान फार पुरातन असून १८२४ साली या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिराच्या दर्शनी भागात कोरलेला आहे. श्री सिद्धेश्वराच्या पिंडीसमोर भाविकांसाठी पूजाअर्चेची व्यवस्था केलेली आहे.

मामाच्या गावाला जाऊ या चा अनुभव देणारे समुद्रकिनारी असलेले गारवा बीच रिसॉर्ट

मुख्य मंदिरासमोर तीन बाजूने तलावाच्या पाण्याने वेढलेल्या एका छोट्या देवळीत श्री गोविंद शास्त्री बर्वे यांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली आहे.  सन  १८९५ ते १९३५ या काळात या सिद्ध पुरुषाचे वास्तव्य या क्षेत्री होते. गोविंद शास्त्री यांनी जुन्या देवळाचा जीर्णोद्धार करून भव्य नवीन मंदिर बांधले. पादुका असलेल्या  या देवळीच्या डाव्या उजव्या बाजूस दोन दगडी हत्ती शिल्प आहेत. मंदिराच्या अगदी सोमोरच साडेचारशे किलो वजनाची सुंदर नक्षीकाम केलेली पंचधातूची अवाढव्‍य अशी पुरातन घंटा आपल्याला बघायला मिळते. हि घंटा काशी येथे घडवली गेली असून त्यावर ”श्री प्रवाळ क्षेत्र वासीने धरणी धराय नमः” असा मजकूर ओतीव घडणावळीत कोरलेला आहे. मोठा सभागृह आणि त्यापुढे गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रवेश केल्यावर प्रथम दृष्टीस पडतो तो श्री गणेशाचे वाहन असलेला मूषक. चार साडेचार फूट उंचीच्या भव्य उंदराने हातात मोठ्ठा लाडू धरलेला आहे. गर्भागृहाच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला आमोद/प्रमोद द्वारपाल भाविकांचे स्वागत करतांना दिसून येतात .

मुख्य गाभार्यात डाव्या सोंडेचा आणि उजव्या सोंडेचा असे दोन गणपती विराजमान आहे . चांदीचे मुकुट धारण केलेल्या या मूर्तीवर दररोज जास्वंद आणि कमळांच्या फुलांची आरास केली जाते. मूर्तींमागे चांदीची प्रभावळ आहे . गाभार्यात चांदीचे  खांब असलेल्या मखरावर  रिद्धिसिद्धिच्या मूर्ती आहेत. संपूर्ण जगात श्री क्षेत्र पद्मालय हे असे तीर्थक्षेत्र आहे जेथे प्रवाळरत्न स्वरूपात प्रकट झालेले डाव्या आणि उजव्या सोंडेचे असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. मंदिरातील या दोन गणेश मूर्ती पैकी एक सहस्त्रअर्जुनाने आणि दुसरी श्रीशेषाने स्थापन केल्‍याचा उल्‍लेख श्रीगणेश पुराणातील उपासना खंडात आढळतो. गणेश चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमेला या तीर्थक्षेत्री मोठी यात्रा भरते. या पुण्यपर्वात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी पद्मालय येथे येतात. माघ शुद्ध चतुर्थीला गजानन जन्मोत्सवही थाटात साजरा करण्यात येतो. नवसाला पावणारा गणपती असल्याची भविकांची श्रद्धा असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात. या स्थानाचे महत्व जाणून थोरले माधवराव पेशव्यांनी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी खान्देश सुभ्यातील ३७ परगण्यांचा निम्मा महसूल पद्मालय देवस्थानास दिला होता . पद्मालय मंदिर संस्थानाला पेशव्यांची सनद मिळाली असल्याने हे देवस्थान अतिशय पुरातन असल्याची खात्री पटते. मुख्य मंदिराच्या भोवती चार दिशांना श्री गणेशाची एकूण एकवीस मंदिरे आहेत.

भीमकुंड

मंदिरा पासुन एक किलोमीटर अंतरावर एका खोल दरीत असलेले भीमकुंड हे म्हणजे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण. पांडव अज्ञात वासात असतांना  भीम आणि बकासुर राक्षसाचे युद्ध येथे झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. युद्धात बकासुर मारला गेल्यानंतर तहान लागल्यावर भीमाने खडकावर प्रहार करून  खड्डा निर्माण केला.  त्यातून वर आलेले पाणी प्राशन करून भिमाने आपली तहान भागवली होती, ते भीम कुंड आज देखील या ठिकाणी पाहायला मिळते.

भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळालेल्या मोर या पक्षांचा वावर मंदिर परिसरात असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला मोरांच्या विणीचा हंगाम असल्याने या काळात मोठ्ठा पिसारा फुलवून नाचणारे अनेक मोर मंदिर परिसराच्या आसपास पाहायला मिळतात. पावसाळ्यात मोराने फुलवलेला पिसारा बघण्यासाठी अनेक जण मुद्दाम येथे येतात .

मामाच्या गावाला जाऊ या चा अनुभव देणारे समुद्रकिनारी असलेले गारवा बीच रिसॉर्ट
Tags: erandolganeshjiGanpatiganpati bappa moryajalgaonpadmalaya ganpatiplaces to see near jalgaonprachin ganesh mandirश्री पद्मालय देवस्थान
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शन

October 19, 2025
किल्ले शिवनेरी: महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह
ऐतिहासिक ठिकाणे

किल्ले शिवनेरी: महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह

September 3, 2025
वीकेंडसाठी धुळ्यातील टॉप 10 ठिकाणे!
ऐतिहासिक ठिकाणे

वीकेंडसाठी धुळ्यातील टॉप 10 ठिकाणे!

August 22, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In