
उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली भेट

मुंबई l महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील दालनांना उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भेट दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
राज्यातील अमरावती, जळगाव, सांगली, सातारा, वर्धा, रायगड, पालघर, या शिवाय इतर जिल्ह्यातील ग्रामीण उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. महाबळेश्वर येथील मध व वर्धा येथील सेवाग्रामची खादी तसेच लाकडी वस्तू, मसाले, देशी गाईचे तूप, तांब्यावरील नक्षीकाम केलेली भांडी, दिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, साबण व इतर गृहोपयोगी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, यांच्या मार्गदर्शनात तर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांच्या नेतृत्वात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
- लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!दापोलीतील निसर्गरम्य ‘लाडघर’ गावाला नक्की भेट द्या! कोकणातील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा शोधत असाल,… Read more: लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
- कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!कोकणचा निसर्ग आणि तिथले अथांग समुद्रकिनारे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू! गर्द नारळी-सुपारीच्या बागा, वाळूत पाऊल… Read more: कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
- महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर‘डेक्कन ओडिसी’सोबत अनुभवता येणार मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा… Read more: महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
- आनंदी निवास, केळशी दापोली“कोकणात असा एक होमस्टे आहे… जिथे एकदा राहिल्यानंतर पर्यटक पुन्हा पुन्हा परत येतात. समुद्रकिनाऱ्यापासून फक्त… Read more: आनंदी निवास, केळशी दापोली
- गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेसगणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन



