
मतिमंद, अपंग मुलांनी तयार केलेल्या सुबक पणत्या, शोभेच्या वस्तू, कागदी फुलांना विषेश मागणी

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली प्रदर्शनाला भेट
मुंबई l ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देणारे मंत्रालयाच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला मंत्रालयातील अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. 18 ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाला भेट देतांना ग्रामीण कारागिरांनी लाकडाच्या माध्यमातून तयार केलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे सुताने तयार केलेला हार अर्पण करुन मंत्री श्री. सामंत यांनी अभिवादन केले. या प्रदर्शनात राज्यभरातून सहभागी झालेल्या उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. मतिमंद, अपंग मुलांनी तयार केलेल्या सुबक पणत्या, शोभेच्या वस्तू, कागदी फुले आणि महिला उद्योजकांनी तयार केलेले खाद्य पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, मध, साबण आणि सुगंधित उटण्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
राज्यातील अमरावती, जळगाव, सांगली, सातारा, वर्धा, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. महाबळेश्वर येथील मध व वर्धा येथील सेवाग्रामची खादी तसेच लाकडी वस्तू, मसाले, देशी गाईचे तूप, तांब्यावरील नक्षीकाम केलेली भांडी, दिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, साबण व इतर गृहोपयोगी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई१ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
- एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
- “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानापालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
- गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवातगांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
- (no title)प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन
