Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी

बारा मोटांची अष्टकोनी विहीर - Video

अन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती !

महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
405 4
0
562
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पर्यटन, व्यापार, कृषी, ऊर्जा संक्रमण, पर्यावरण इ. क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई l महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पर्यटन, व्यापार, कृषी, ऊर्जा संक्रमण, शिक्षण, तंत्रज्ञान सेवा आणि कृषी-अन्न प्रक्रिया तसेच पर्यावरण इ. क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी प्रिमियर आणि राज्य विकास, व्यापार आणि पर्यटन मंत्री रोजर कुक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भारतीय वंशाचे ज्येष्ठ संसद सदस्य येझ मुबारकई, डेप्युटी प्रिमियरचे चीफ ऑफ स्टाफ नील फर्गस, कौन्सुल – जनरल मुंबई, पीटर ट्रुसवेल, पर्यटन, विज्ञान आणि नवोपक्रम विभागाच्या महासंचालक रेबेका ब्राउन, ऑस्ट्रेलियन डेप्युटी कॉन्सुल-जनरल मायकेल ब्राउन, यांसह अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुख्य कार्यकारी अधिकारी (एमआयडीसी) डॉ. पी. अनबलगन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी राजेश गवांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे भारताचे पॉवर हाऊस आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा हिस्सा आहे. येथे विविध क्षेत्रासाठी चांगले वातावरण असून पायाभूत सोयी – सुविधाही  मोठ्या प्रमाणावर आहेत. महाराष्ट्र हे आगामी काही वर्षात कृषिसंपन्न राज्य व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान या विषयात काम करण्यास अधिक संधी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यात विकेंद्रित सौर वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. किमान 30 टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या क्षेत्रातदेखील सहकार्य करावे तसेच कोळशाचे वायुकरण या क्षेत्रातदेखील काम करण्यासाठी संधी असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आगामी काळात विविध विभागांतर्गत उपलब्ध असलेल्या संधी लक्षात घेऊन एक सर्वसमावेशक धोरण निश्चित करेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोजर कुक यांनी सांगितले, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.  शेती व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी व काम करण्यासाठी  तसेच आगामी काळात महाराष्ट्र व वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात येतील. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ संसद सदस्य येझ मुबारकई यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीयांचे योगदान आणि असलेल्या विविध संधी याबाबत माहिती दिली.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Agastya Sea View Apartments, Dapoli
Tags: agro tourismDevendra FadanvisIndia Tourismkokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismवेस्टर्न ऑस्ट्रेलिया
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In