Saturday, July 25, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी ‘भक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प

पुण्यातील ह्या पर्यटन स्थळांबद्दल आपणास माहिती आहे का?

पानिपत येथे मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात

धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी ‘भक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 7, 2022
401 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

केंद्रीय पुरातत्व विभागाने महाराष्ट्राच्या स्थळांच्या देखभालीविषयी विधिमंडळात अहवाल सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महापर्यटन ।नवी दिल्ली । महाराष्ट्रातील एकवीरा देवी मंदिर, लेण्याद्री मंदिरासोबतच अन्य ऐतिहासिक,  धार्मिक स्थळे, जी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात येतात, त्यावर झालेल्या देखभालीच्या खर्चाविषयी अहवाल विधिमंडळाच्या पटलावर पुरातत्व विभागाने सादर करावा, याबाबतचे  निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, राज्यातील जी  ऐतिहासिक स्थळे, मंदिरे, स्मारके  केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात येतात. इच्छा असूनदेखील राज्यातील जनतेला तसेच राज्य शासनाला अशा स्थळांचे नविनीकरण, सौंदर्यीकरण, डागडुजी करता येत नाही. तसेच पुरातत्व विभागाकडूनही अनेक वर्षांपासून डागडुजी होत  नसल्याची शंका डॉ. गोऱ्हे यांनी  व्यक्त केली.

त्यामुळे अशा स्थळांची अधिकच दुरावस्था होत चाललेली आहे.  केंद्रीय पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील स्थळांमध्ये काय काम केले आहे. याविषयी केंद्रीय पुरातत्व विभागाने विधीमंडळात अहवाल सादर करावा, याबाबतचे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.  लोकसभा अध्यक्ष हे संबंधित विभागाला निर्देशित करतील अशी, अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राशी निगडित असणाऱ्या परराज्यातील धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी ‘भक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊलखुणा देशभर आढळतात. विशेषत्वाने मध्यप्रदेश, हरीयाणा, उत्तरप्रदेश या ठिकाणी उमटून दिसतात. अशा स्थानांवर येणाऱ्या भाविकांची तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘भक्ती निवास’ बांधण्‍याचा संकल्प उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात पुढील काळात या कामासंबधी आखणी केली जाईल अशी, माहितीही त्यांनी योवळी दिली.

आमदारांकडून येणाऱ्या सूचनेवरून भविष्यात विधीमंडळात देशातील उत्तम काम करणाऱ्या खासदारांची व्याख्याने आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी सकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी उपसभापती डॉ गोऱ्हे,  विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismkonkanMahaparyatan.comनीलम गोऱ्हेपुरातत्व
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In