Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पानिपत येथे मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात

धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी ‘भक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन

पानिपत येथे मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 8, 2022
399 5
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार… विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई :- पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या मराठा सैनिकांना स्मारकस्थळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हरियाणा राज्यातील रोड मराठा संघटनेच्या विनंतीवरून पानिपत येथील युद्ध स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे याबाबत येथील स्थानिक शासकीय अधिकारी आणि रोड मराठा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तेथील समस्या डॉ.गोऱ्हे यांनी जाणून घेतल्या.

मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता विशेष प्रयत्न करण्याची सूचना यावेळी स्थानिक प्रशासनाला करण्यात आली. या कामासाठी वित्त आयोगाच्या जिल्हा नियोजन अथवा लोकप्रतिनिधींच्या निधीतून विकासकामांचे नियोजन करण्याबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पानिपत येथील स्थानिक अधिकारी यांना दिल्या. स्थानिक जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाकडून याकरिता प्रयत्न होण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पानिपत स्मारक परिसरात अत्यावश्यक सुविधांबाबत चर्चा – सद्यस्थितीत स्मारकाची दैनंदिन व्यवस्था चोख असण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. या स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रत्येक वर्षी १ लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पर्यटकांच्या व स्मारकाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक म्हणून होम गार्ड यांची नेमणूक करणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, स्वच्छता राखणे, तसेच  स्मारकामध्ये  सीसीटीव्हीची सुविधाही आवश्यक आहे. प्रकाश योजना असलेला लाईट शो, हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सुसज्ज कॅन्टीन, युद्धाची आणि इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय या स्मारकाशेजारी उभारावे, ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पुस्तकांचे वाचनालय – ग्रंथालय, पर्यटकांसाठी प्रशिक्षित गाईड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी हरियाणा रोड मराठा संघटनेचे गुरदयाल सिंग, झिले सिंग, राजेशकुमार चोपडा, बळबिर सिंग कल्याण, भीम सिंग, रामणारायन मराठा, मराठा राजेंद्र शेरा, कमलजीत महाले, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, हरियाणा, मुलतानसिंग महाले, श्री.महेंद्र काज, पानिपतचे दंडाधिकारी राजेशकुमार सोनी, पुरातत्व विभागाचे अधिकारी वेदप्रकाश, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त झेलम जोशी, श्री. रवींद्र खेबुडकर, योगेश जाधव, प्रवीण सोनावणे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismMarathaPanipatratnagiri tourismपानिपत
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In