
शिमगोत्सव हा कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण… या उत्सवादरम्यान सादर होणारे पालखीनृत्य म्हणजे कोंकणातील प्राचीन परंपरेचे दर्शन….
या सणासाठी चाकरमानी आवर्जून आपल्या गावी हजेरी लावतातच…
कोकणातील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि एकतेचे दर्शन घडवणारा उत्सव… शेकडो वर्षांच्या परंपरा आणि एकमेकांचा मान जपत प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवात सहभागी होतो… या उत्सवादर्म्यान सादर होणा-या लोककला म्हणजे कोकणचं वैभव.
कोकणातील गावागावात शिमगोत्सवाच्या निमित्ताने विविध परंपरा जपल्या जातात… धुळवडी पर्यंत कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतांचे उत्सव वर्षानुवर्षाच्या परंपरा आणि मान जपत साजरा करतो… जे जे गैर आणि अनिष्ट आहे त्याचा नाश करण्याचा हा उत्सव ख-या अर्थाने कोकणच्या सांस्कृतिक वैभवाच दर्शन घडवतो.. कोकणाने ह्या परंपरा जपल्यात आणि म्हणूनच कोकण सर्वच क्षेत्रात समृद्ध आहे…
त्यातीलच एक लोककला आजही जोपासली जात आहे ती म्हणजे पालखीनृत्य किंव्हा पालखी नाचवणे. ग्रामदेवी पालखीत बसून गाव प्रदीक्षेणाला निघते. परिसरातील भाविक या उत्सवात मनोभावे सहभागी होत असतात.
आपल्या ग्रामदैवतेची पालखी लीलया खेळवत भाविक त्याचा आनंद घेत आहेत. डफ, हलगी आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर पालखीनृत्य सादर केलं जातं.
कोकणातील ही लोककला एक पिढी हा ठेवा आपल्या पुढील पिढीला देते आणि ती पिढी तितक्या अत्मियतेने या संस्कृतीच्या ठेव्याची परंपरा वर्षांनुवर्ष पुढे चालवत ठेवते. हेच वैशिष्ट्य कोंकणकरांनी आजही जपून ठेवले आहे.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन
