Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते

विकासामध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्टे महत्त्वाची... उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सप्तचिरंजीवनपैकी एक असलेल्या भगवान परशुराम यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा (Video)

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 20, 2021
404 4
0
561
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

Gandhi Teerth – Jain Hills

जळगाव – आनंद,समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते,यातूनच वैचारिक समृद्धी घडते.

‘भाऊंना भावांजली’ परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी चित्रप्रदर्शनातील ‘कला आणि माणूस’ या संदर्भात चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी देशदूतचे संपादक हेमंत अलोने, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, हरुन पटेल, ज्ञानेश्वर शेंडे, कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सहभाग घेतला.

कला आणि संस्कृती यांची माणसाच्या जडणघडणीत असलेले महत्त्व याविषयी चर्चा करताना हरुन पटेल यांनी जगण्याचे सौंदर्य निर्माण करते ती कला असे स्पष्ट केले. कलावंत हा नेहमी नवे भावविश्व निर्माण करीत असतो, यातूनही बौद्धिक समृद्धी घडते. माणसाच्या इतिहासाचा आढावा घेतला असता तर मूळ स्वरूपातील जी चित्रकला होती ती गुहेत होती, ती बहरत गेली आणि त्यातूनच कलावंत घडत गेला ,माणुसकीचा संस्कारही वाढत गेला. संस्कृती संस्कारीत करण्यासाठी कला खूप महत्त्वाची आहे ती मानवाला समृद्ध करते आणि बौद्धिक विकासही करते असे हरून पटेल यांनी म्हटले.

चित्रकार राजू बाविस्कर यांनी भाऊंच्या उद्यानातील वानखेडे कलादालनामध्ये ‘लाॕकडाउन डायरी’ या चित्र प्रदर्शनाविषयी माहिती दिली. कोणत्याही शहराची सांस्कृतिक ओळख ही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने जळगाव शहराची सांस्कृतिक ओळख हे भवरलालजी जैन व अशोकभाऊ जैन यांच्या प्रोत्साहनामुळे होत असल्याचे गौरवोद्गार राजू बाविस्कर यांनी काढणे. ‘लाॕकडाउन डायरी’ या प्रदर्शनाची थीम सांगताना विजय जैन यांनी सामान्य माणसांचा आशावाद असणारी ही कोरोना काळातील चित्रे असल्याचे सांगितले.

कला आणि माणूस हे नातं जोडताना हेमंत अलोने यांनी शहराची प्रगती हे कलावंतांवरही अवलंबून असते. यातून माणूस व कलेचे नातं जोडता येऊ शकते. शहर सांस्कृतिक समृद्ध करण्यासाठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, आनंद, समाधान आणि नवनिर्मिती करायचे असेल तर प्रत्येक जण कलाकाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले पाहिजे आणि हे काम जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन आणि आता अशोक जैन हे नेहमी करीत असल्याचे हेमंत अलोने म्हणाले. चित्र सूचणे आणि ते साकारणे हा प्रवास म्हणजे मनाचे प्रतिबिंब होय,असे कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सांगत चित्र साक्षरता विषयावर भाष्य केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी कला आणि संस्कृती या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

Tags: agro tourismashokbhau jainBhavarlal JainIndia TourismJain Group of CompanyJain HillskonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In