Monday, August 3, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कोकणातील प्रसिद्ध उकडीचे मोदक बनवण्याची झटपट रेसिपी

श्री देव विरेश्वर मंदिर, महाड

कोकणातील इच्छापूर्ती गणेश

कोकणातील प्रसिद्ध उकडीचे मोदक बनवण्याची झटपट रेसिपी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 9, 2021
547 6
0
760
SHARES
3.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गणपतीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याच्या यादीमधील सर्वात पहिला क्रमांक उकडीच्या मोदकांचा लागतो

व्हिडिओत दाखविलेल्या कृती प्रमाणे उकडीचे मोदक केल्यास ते छान होतात, त्यात गाठी होऊन मोदक खराब होत नाहीत, मोदक मोडत नाहीत

मोदक हा महाराष्ट्रासह दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याची परंपरा आहे. हे मोदक नारळाचा किस, गूळ आणि तांदळाच्या पिठापासून पारंपरिक पद्धतीने केले जातात.

महापर्यटनचा व्हिडीओ चमू विविध पर्यटनस्थळांचे चित्रीकरण करत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पोहचला असता कोळथरे गावातील समुद्रकिनारी असलेल्या गारवा बीच रिसॉर्टचे संचालक श्री. आनंद भावे यांच्याशी परिचय झाला. गप्पागोष्टींच्या ओघात गारवाचे उकडीचे मोदक प्रसिद्ध असल्याचे कळले . आमच्या विनंतीवरून श्री भावे यांनी हे मोदक प्रत्यक्ष कसे कराचे याची रेसिपी आम्हाला प्रात्यक्षिकासह करून दाखवायचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी भावे यांच्या मातोश्री श्रीमती शुभदा अशोक भावे आणि सौ.शुभांगी आनंद भावे यांनी गारवा बीच रिसॉर्टच्या किचनमध्ये चुलीवर उकडीचे मोदक कसे बनवायचे याची संपूर्ण कृती प्रात्यक्षिकासह करून दाखवली. या दोघींनी दाखविलेल्या कृती प्रमाणे उकडीचे मोदक केल्यास ते छान होतात, त्यात गाठी होऊन मोदक खराब होत नाहीत, मोदक मोडत नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उकडीचे मोदक कसे बनवायचे – पाककृती

उकडीचे मोदक (Steamed modak) बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
सारण – १ मोठा नारळ (Coconut), गरजेनुसार किसलेला गूळ, आवडीनुसार वेलचीपूड किंवा जायफळ,
उकड – एक मोठा कप तांदूळाचे पिठ, तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी थेंबभर तेल किंवा तूप, चिमूटभर मीठ

सारण बनवण्याची कृती : सारण बनवण्यासाठी एक नारळ खवून घ्यावा. जेव्हढ्या प्रमाणात खवलेला नारळ असेल त्याच्या अर्धा वाटा किसलेला गूळ घ्यावा. एका जाड पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि आवडीनुसार वेलची पूड किंवा जायफळ घालावी. व्यवस्थित ढवळून झाल्यावर गरम असलेले सारण निवळण्यासाठी बाजूला झाकून ठेवून द्यावे.

उकड करण्यासाठी कृती : प्रथम चुलीवर एका जाड भांड्यात जेवढे तांदुळाचे पीठ तेवढेच पाणी घेऊन गरम करायला ठेवा. त्यात थेंबभर तेल आणि चिमूटभर मीठ घाला. पाणी चांगले उकळल्यावर त्यात तांदुळाची पिठी घाला. मिश्रण ढवळून एकजीव करून घ्यावे. पाच मिनिटांनंतर एक वाफ आल्यावर उकड जास्त कोरडी वाटल्यास त्यावर पाण्याचा हबका मारून उकड झाकून ठेवा. मध्यम आचेवर पाच मिनीटे झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढावी. त्यानंतर गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.

चांगली वाफ धरल्यावर परातीत तयार उकड काढून घेऊन एक सारखी मळून घ्यावी. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून एकजीव करून घ्यावी. उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे मोठे गोळे करून घ्यावेत. केळीच्या पानावर थेंबभर तेल आणि पाणी लावून घ्यावे. हाताने त्याची गोलसर पारी थापून घ्यावी. त्यात सारण भरून बोटाने पारीला चारपाच पाकळ्या/कळ्या कराव्यात आणि सर्व कळ्या एकत्र आणून मोदकाचे तोंड बंद करावे. त्याचे नाक काढून मोदकाला व्यवस्थित आकार द्यावा. सारण भरून तयार केलेले मोदक एका स्वच्छ पुसून घेतलेल्या केळीच्या पानावर ठेवावे. चुलीवर तांब्याचे मोदकपात्र ठेऊन वाफ येण्यासाठी त्यात पाणी उकळून घ्यावे. पात्राच्या चाळणीवर केळीच्या पानासकट मोदक ठेवावेत. पात्रावर झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढावी. मोदकपात्राच्या झाकणाच्या कडेतून पाणी बाहेर यायायला लागले कि पात्र उघडून आतील मोदक केळीच्या पानासह बाहेर काढावेत. मोदकांना चमक / शायनिंग आलेली दिसली कि समजावे मोदक खाण्यासाठी तयार झाले आहेत. थोडासा पाण्याचा थोडासा हबका मारून गरमागरम मोदक एका डिश मध्ये काढून घ्यावे. त्यावर कणीदार साजूक (गावराणी) तूप घालून गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवावा आणि गरमागरम मोदकांचा समाचार घ्यावा.

रेसिपी बघून चांगल्या झालेल्या उकडीच्या मोदकांवर साजूक तुपाची धार धरत, बाप्पाला नैवैद्य दाखवून झाल्यावर कुटुंबियांसह प्रसाद ग्रहण करावा…….

Tags: Dapoliganpati bappa moryaGanpati NaivedyaGarva Beach ResortsKhadya BhramantiKokan FoodModakRATNAGIRISteamed modakUkdiche Modakउकडीचे मोदकखाद्य भ्रमंतीगणपतीला प्रिय असलेले उकडीचे मोदक
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In