Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जैन चार्तुमास – २०२४ च्या नियोजनाची बैठक संपन्न

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव - २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया यांची निवड

जल पर्यटनच्या वाढीव विकास आराखड्यास मंजूरी देणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जैन चार्तुमास – २०२४ च्या नियोजनाची बैठक संपन्न

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
June 24, 2024
400 4
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जैन स्थानकवासी चार्तुमास समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड

आचार्य १००८ श्री रामलालजी म.सा. यांचे शिष्य श्री सुमितमुनिजी म.सा. यांचा चार्तुमास

जळगाव | जैन धर्माच्या चार्तुमासाच्या नियोजनासंबंधित महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. दरवर्षीप्रमाणे दि. २० जुलै पासून जैन धर्माच्या चार्तुमासाचे आयोजन स्वाध्याय भवन, गणपतीनगर येथे करण्यात आले आहे. या चार्तुमासाच्या काळात विविध धार्मिक अनुष्ठांन, धर्माराधना, परिषुण पर्व, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध संदेशपर सजीव देखावे, दररोज मंगल प्रवचनाचे तसेच संत-महात्मांच्या जयंती व दीक्षांत दिन मोठ्या उत्साहात साजरा केले जाईल. चार्तुमासात परमपूज्य आचार्य भगवंत १००८ श्री रामलालजी म. सा. यांचे आज्ञानुवर्ती शासन दीपक श्री सुमितमुनिजी म. सा., श्री भूतिप्रज्ञजी म. सा., श्रीऋजुप्रज्ञजी म.सा. आदी ठाणा-३ यांच्याकडून ‘जैन दर्शन’ घडणार आहे.

जैन धर्मामधील अत्यंत प्रज्ञावान संतमुनी म्हणून पूज्य सुमितमुनिजी म. सा. सह संतमुनी ओळखले जातात. त्यांचा मोठा शिष्यगण आहे. जैन मुनी आत्मोन्नती बरोबर लोकांना धर्मानुरुप आचारणासाठी प्रेरणा देत असतात. समस्त विश्वामध्ये ‘जैन दर्शन’ ला विशेष महत्त्व आणि ओळख आहे. सत्य, अहिंसा, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या मूलभूत सिद्धांतामध्ये समस्त मानवजातीच्या उध्दाराचे गुपित सामावले आहे. हे सर्व विस्ताराने जाणून घेण्यासाठी चार्तुमास काळ सर्वश्रेष्ठ मानला जातो. जन्मोजन्मींचा फेरांचे समापन करावयाचे असल्यास व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर करावयाचा असल्यास धर्म सिद्धांताच्या वाटेने जावेच लागेल. चार्तुमास काळात बाहेर गावाहून येणाऱ्या सुश्रावकांची ये-जा चालू असते. या संतांचा मागील चार्तुमास रतलाम, मध्यप्रदेश येथे होता.

या सभेमध्ये हा चार्तुमास कुण्याही एका संप्रदाय वा पंथाचा नसून समाज व मानव कल्याणासाठी चार्तुमास आहे. या चार्तुमासाच्या कालावधीत सर्वांनी आपआपली जबाबदारी समजून सेवा द्यावयाची आहे. तत्पूर्वी जैन स्थानकवासी चार्तुमास समिती-२०२४ च्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चार्तुमास समितीस सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. त्यांनी जळगाव जैन श्री संघाचा संपूर्ण भारतात असलेला गौरव अधिक वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. चार्तुमास समितीस प्रामुख्याने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे नियमित मार्गदर्शन करतील.

यावेळी माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी हे शिर्षस्थानी असतील. बैठकीसाठी मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते तसेच सर्वांनी एकदिलाने चार्तुमास उत्साहात संपन्न, यशस्वी करण्याचा निश्चिय केला.

Tags: Gandhi teerthIndia TourismJainJain HillsMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In