Friday, July 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
केळशीच्या समुद्रकिनारी फिश पार्टी – सुरमयी फ्राय आणि प्रॉन्स करीची मेजवानी

रत्नदुर्ग / भगवती किल्ला, रत्नागिरी

Shri Ashtavne Ganpati Temple, Guhagar, Ratnangiri,

केळशीच्या समुद्रकिनारी फिश पार्टी – सुरमयी फ्राय आणि प्रॉन्स करीची मेजवानी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 10, 2021
433 4
0
601
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महापर्यटन या डिजिटल वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन (Maharashtra Tourism) स्थळांचे चित्रीकरण करून माहितीपट स्वरूपात आपल्यापर्यंत युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवत असतो.कोकणात (Kokan) चित्रीकरण करत असतांना महापर्यंतची टीम रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पोचली. आसूद बाग गाव , दुर्गादेवी मुरुड, कनकदुर्ग, हर्णे किल्ला/दीपगृह, हर्णे बंदर, फतेहगड, राममंदिर पाजपंढरी, कड्यावरचा गणपती या ठिकाणांचे चित्रीकरण पूर्ण करत आम्ही समुद्रकिनारी असलेल्या केळशी (Kelshi) या निसर्गरम्य गावात पोचलो त्यावेळी दुपारचे दोन वाजले, आणि सगळ्यांच्याच पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले.

केळशी गावात असलेल्या श्री महालक्ष्मी देवस्थान (Mahalakshmi Temple Kelshi), याकूबबाबा दर्गा (Yakub Baba Dargah), आणि वाळूचा डोंगर (Sand Dun) या ठिकाणांचे चित्रीकरण करायचे नियोजन होते. गाव छोटेसे असल्याने इथे ऐनवेळेला भोजनाची सोय होऊ शकत नाही मात्र पूर्व कल्पना दिल्यास गावात शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाची सोय होऊ शकते अशी माहिती मिळाली. मात्र आमच्या टीम बरोबर News १८ लोकमतचे दापोली प्रतिनिधी श्री शिवाजी गोरे हे हि होते. त्यांनी सहकार्य करत केळशीत घरगुती भोजनाची सोय करणाऱ्या शिवतेज सहवास या भोजन गृहाच्या संचालिका सौ प्रियांका यांच्याशी संपर्क साधत आम्हा सगळ्याच्या भोजनाची सोय होत असल्याची माहिती दिल्याने सगळ्यांनाच दिलासा मिळाला.

दापोलीतील समुद्रकिनारी असलेले सर्व सुखसोयीनी युक्त गारवा बीच रिसॉर्टला नक्की भेट द्या

अगदी कमी वेळात त्यांनी आमच्यासाठी फिश फ्राय (Fish Fry), प्रॉन्स करी (Prawns Curry), तांदळाची भाकरी (Rice Bread), भात (Fish Rice) असा खासा बेत केला होता. तीन वाजता आम्ही शिवतेज निसर्ग सहवास या भोजन गृहात पोचलो. त्यावेळी प्रॉन्स करी तयार झाली होती आणि चुलीवर तव्यात सुरमयी फ्राय करणे सुरु होते. आमच्या टीमने हि तत्परता दाखवत चित्रीकरण सुरु केले . सौ प्रिया यांच्याशी स्वयंपाक करत असतांना बातचीत करत आम्ही पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या फिश फूडची रेसिपी आम्हाला सांगितली, कोकणात पारंपरिक पद्धतीने (Recipe) मासे कसे बनवायचे (Kokans Traditional Sea Food), इथे येणारे पर्यटक शाकाहारी आणि मांसाहारी प्रकारात कुठल्या प्रकारची व्यंजने आवडतात याची हि माहिती त्यांनी आम्हाला दिली.

दापोलीत आल्यावर शुद्ध शाकाहारी न्याहारी आणि भोजनासाठी सात्विक उपाहारगृहाला नक्की भेट द्या

सौ. प्रिया यांच्याशी झालेल्या संभाषणाचा अनकट व्हिडीओ आम्ही आपल्यापर्यंत महापर्यंतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत आहोत. त्यानंतर आम्ही तयार झालेले जेवण केळशीच्या (Kelshi Sea) समुद्रकिनारी असलेल्या सुरुच्या बनात आम्ही जेवणाचा (Lunch) आनंद लुटला. प्रचंड भूक लागली असल्याने जेवणावर आम्ही चांगलाच ताव मारला.

फॅक्ट्रीत काजू कसा तयार होतो – हा व्हिडीओ नक्की बघा

Tags: DapoliFish FryFish RiceKelshiKelshi Seakokankokan tourismKokans Traditional Sea FoodMahalakshmi Temple Kelshimaharashtra tourismNisarga SahavasPrawns CurryRATNAGIRIRice BreadSand DunYakub Baba Dargah
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In