Thursday, October 29, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मौजे मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन

दिवेआगर येथील 2 हेक्टर क्षेत्रावर विस्तारित सुपारी संशोधन संशोधन केंद्र

वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 11, 2024
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

६५ हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द

मुंबई | वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वन विभागाने  ६५,७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. यामुळे  वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत वनविभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  नावावर करण्याचाही विक्रम केला आहे.

चंद्रपूर येथे वनविभागाच्यावतीने १ ते ३ मार्च या कालावधीत ‘ताडोबा महोत्सव २०२४’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प शनिवारी (२ मार्च) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या तब्बल ६५,७२४ रोपट्यांनी ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त केले.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आतापर्यंत वन विभागाने चार लिमका रेकॉर्ड केले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारी, वन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपूर येथे ६५,७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या ‘हरित भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिप गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकर, वनअधिकारी प्रशांत खाडे, मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.

त्वरित उद्यान करण्याच्या सूचना – ‘भारतमाता’ शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वनविभागाने एक चांगले उद्यान त्वरीत साकारावे. तसेच आज मिळालेले प्रमाणपत्र हे तेथे दर्शनी भागात लावावे. विशेष म्हणजे ही रोपटे सुध्दा नवनिर्मित उद्यानामध्ये ‘भारतमाता’ याच शब्दाप्रमाणे लावावीत, अशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली.

Tags: agro tourismChandrapurIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismWildlifeWorld records
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In