Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महामार्गांवरील पेट्रोल पंप, पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्र येथे असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था

देशातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग साताऱ्यात

वाघांची राजधानी चंद्रपूर येथे ‘ताडोबा फेस्टिव्हल’

महामार्गांवरील पेट्रोल पंप, पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्र येथे असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 29, 2024
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रवाशांना व भाविकांना खूपच त्रास सहन करावा लागत असल्यानं स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात व सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात…. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई | राज्यातील सर्व महामार्गावरील, पेट्रोल पंपावरील आणि तीर्थक्षेत्र मधील सार्वजनिक स्वच्छतागृह ही अस्वच्छ व दुर्लक्षित आहेत. ती फार तुटपुंजी असून अनेक ठिकाणी शौचालयात आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यामुळे प्रवाशांना व भाविकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सध्याची अस्तित्वातील सर्व स्वच्छतागृहे ही सुस्थितीत ठेवावीत.

आज विधानभवनातील सभापती यांच्या दालनात महामार्गावरील व तीर्थक्षेत्रामधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेबाबत बैठक झाली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिल्या.

तसेच ज्या ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत त्या ठिकाणी अद्ययावत अशी स्वच्छतागृहे उभारली जावीत. त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. विशेषतः महिलांसाठीची स्वच्छतागृहे सुस्थितीत राहतील आणि त्यामध्ये पुरेसे पाणी,सॅनिटरी पॅड साठी मशीन, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कचरा पेटी, हात धुण्यासाठी साबण व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत खबरदारी घेतली जावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांना दिल्या.

त्यापुढे म्हणाल्या की, राज्यभर पेट्रोल पंपावर स्वच्छता गृहांची तपासणी विशेष मोहीम द्वारे करावी. व अस्वच्छ व दुर्लक्षित स्वच्छता गृहे तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छता गृहे उपलब्धतेबाबत ॲप तयार करावे. या ॲपमार्फत उपलब्ध स्वच्छतागृहांची माहिती लोकांना मिळेल. तसेच या स्वच्छता गृहांचे मानांकन करून ॲपवर घ्यावे. त्यामुळे चांगल्या स्वच्छता गृहांची माहिती लोकांना या ॲप मध्ये उपलब्ध होईल.

तसेच आळंदीसह राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळांच्या ठिकाणीही चांगली, आधुनिक व सर्व सोयींनीयुक्त अशी स्वच्छतागृहे बांधावीत, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, याविषयासंदर्भात हमसफर संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याचसोबत प्रत्येक हॅाटेल व रिसॉर्ट मधील स्वच्छतागृहे सर्वांना व विशेषत: महिला प्रवाशांना कायद्याने खुली केली आहेत. परंतु त्याची माहिती सर्वदूर पोहचविण्यात येईल, असे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले. उपसभापती यांनी केलेल्या सूचनांनुसार लवकरच त्या अनुषंगाने तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In