Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
शिवगर्जना महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती

मधाचा सुप्रसिद्ध ब्रॅंड 'मधुबन' आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही उपलब्ध

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव

शिवगर्जना महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 6, 2024
402 5
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, उंट यांच्या प्रत्यक्ष सहभागने भारावले शिवभक्त

सांगली | छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्व सामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवगर्जना महानाट्य उपयुक्त ठरत आहे. या महानाट्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून गेले तीन दिवस सुरू असलेल्या शिवगर्जना महानाट्य उपक्रमाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदि उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर गेले तीन दिवस ही शिवगाथा सांगलीकरांसाठी विनामूल्य सादर करण्यात आली. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली व अलौकिक वारसा तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

या महानाट्यात १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. २५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. हजारो शिवप्रेमींनी या महानाट्याचा आनंद घेतला.

अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराज्यांची हत्या, शिवजन्म, युध्द कला व राज्य कारभारांचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगड वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लुट, कोकण मोहीम, पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरे बलिदान अशा शिवरायांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांनी साक्षात शिवकाल शिवप्रेमींपुढे उभा राहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी केलेल्या नेत्रदीपक आतषबाजीमुळे मैदान उजळून निघाले.

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismमहानाट्यशिवगर्जना
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In