Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जळगाव महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित्त शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरित क्रांतिचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार भव्य सोहळ्यात जैन इरिगेशन सिस्टिम लि. ला प्रदान

शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत जानेवारीत  'मुंबई फेस्टिव्हल २०२४' चे आयोजन

जळगाव महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित्त शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 8, 2024
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

जळगाव शहरातील ८९८१ विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनाला दिली भेट

जळगाव l महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानात सोमवार, दि. ८ जानेवारी २०२४ रोजी शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक व नाशक, पोलीस बॅन्ड, वायरलेस इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता हवेत तिरंगे फुगे सोडून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांचे हस्ते सोडून करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, प्रितम शिंदे, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. यासह एन.सी.सी. व एन.एस.एस. चे कॅडेट सुद्धा उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संदिप गावित यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचा इतिहास मांडला तर आभार प्रदर्शन प्रो. उपेंद्र केसुर यांनी केले. युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. पोलीस विभाग व नागरिकांमध्ये सम्न्वय व संवाद वाढावा तसेच विद्यार्थ्यांना पोलीस विभागातातील संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आयोजन केल्याचे कावडीयांनी सांगितले. सूत्रसंचालन सहाय्यक फौजदार देविदास वाघ यांनी केले.

यावेळी जळगाव शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यामध्ये राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, बॉम्ब शोधक व नाशक पथकचे प्रभारी अधिकारी अमोल कवळे, राखीव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर साळंके, मंगल पवार, बिनतारी संदेश विभागाचे एम. जी. पाटील, सहाय्यक फौजदार एन. एम. शेख, एन.सी.सी.चे कॅप्टन योगेश बोरसे उपस्थित होते.

प्रदर्शनात एके 47, एसएलआर रायफल, कारबाईन 9एमएम, अश्रुधूर साठा, पम्प अॅक्शन, 9एमएम पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डॉबरमॅन व लॅबेडर प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगानियंत्रण पथकातील कमांडो, इन्सास रायफल आदी पोलीस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचे प्रदर्शनात समावेश होते. पोलीस प्रशिक्षक सहाय्यक फौजदार देविदास वाघ, राजेश वाघ, सोपानदेव पाटील, पोलीस हवालदार आशिष चौधरी, अनिल तडवी, संदिप पवार, रजाक सैय्यद, सुभाष हिरबक्षी, दिपक पाटील यांनी उपस्थित नागरिकांना व विद्यार्थ्यांना उपरोक्त शस्त्रांची संपूर्ण माहिती दिली. जळगाव शहरातील ८९८१ विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून प्रदर्शनात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक फौजदार देविदास वाघ, राजेश वाघ, सोपानदेव पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, यश राठोड, तन्मय मनोरे, तृषांत तिवारी, ओम पाटील, पियुष हसवाल, सुरज परदेशी, ओम चौधरी, गणेश बारी, राहूल चव्हाण, मयुर आमोदकर, तुषार पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Tags: agro tourismjalgaonmahaparyatanMahaparyatan.comMaharashtra police
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In